

धारूर : पुढारी वृत्तसेवा
बीडच्या धारूर तालुक्यातील कानपूर येथे आणखी एक युवकाची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ओळखीचा आहे. स्वप्निल देशमुख अस मृताचे नाव आहे. जुन्या वादातून खून झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणात सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
धारूर तालुक्यातील कन्नापूर येथे दोन वर्षांपूर्वी किराणा दुकानदार अविनाश देशमुख यांनी २३ मार्च २०२३ रोजी जीवन संपवले होते. हा जीवन संपवण्याचा प्रकार मृत स्वप्निलच्या मानसिक जाचाला कंटाळून केल्याचा गुन्हा नोंद आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्निल हा अविनाश देशमुख यांच्या कुटुंबावर दबावा आणत होता. यातूनच स्वप्निल देशमुखचा अविनाश देशमुखचा भाउ संतोष देशमुखसोबत वाद झाला.
ह्या भांडणात बबलू उर्फ स्वप्निल देशमुख याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, अविनाश देशमुख यांनी ज्या लिंबाच्या झाडाखाली जीवन संपवले होते, त्याच झाडाखाली स्वप्निलची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. हत्येनंतर संतोष देशमुख आणि त्यांची पत्नी सोनाली देशमुख स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले.