वाशिम: जि. प. अध्यक्षपदी चंद्रकांत ठाकरे, तर उपाध्यक्षपदी चक्रधर गोटे बिनविरोध

वाशिम: जि. प. अध्यक्षपदी चंद्रकांत ठाकरे, तर उपाध्यक्षपदी चक्रधर  गोटे बिनविरोध
वाशिम: जि. प. अध्यक्षपदी चंद्रकांत ठाकरे, तर उपाध्यक्षपदी चक्रधर गोटे बिनविरोध
Published on
Updated on

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आज (दि.१४) अध्यक्षपदासाठी चंद्रकांत ठाकरे तर उपाध्यक्षपदासाठी चक्रधर गोटे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. त्यांच्यविरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत ठाकरे अध्यक्षपदासाठी, तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे चक्रधर गोटे बिनविरोध निवडून आले.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व पक्षीय घडी बसविण्यात चंद्रकांत ठाकरे यशस्वी ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे तिसऱ्यांदा जि. प. अध्यक्ष झाले आहेत. तर तालुक्यातील काँग्रेसचे युवा नेते म्हणून ४ वेळा सभापती राहलेले चक्रधर गोटे यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले आहेत. वाशिम जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 काँग्रेसचे 11 तर शिवसेनेचे 6 सदस्य आहेत.

वाशिम जिल्हा परिषद पक्षीय बलाबल ( एकूण 52 जागा)

राष्ट्रवादी काँग्रेस : 14

काँग्रेस : 11
वंचित : 6
भाजपा : 7
वाशिम जिल्हा जनविकास आघाडी : 6
शिवसेना : 6
स्वाभिमानी शेतकरी संघटना : 1
अपक्ष : 1

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news