बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, यलो अलर्ट जारी; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, यलो अलर्ट जारी; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
Published on
Updated on

बीड; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात 6 ते 8 एप्रिल 2023 या कालावधीत जिल्ह्यात तुरळ ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबईने याबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील संबंधित शासन यंत्रणा व नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक 5 एप्रिल, 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार शक्यता वर्तवली आहे.
खबरदारीची उपायोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घेण्यात यावी.

या गोष्टी करा :

1) विजेच्या गडगडासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
2) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
3) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. 4) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहा.
5) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करू नका:

1 ) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली आंघोळ करू नका. 2) घरातील बेसिन चे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नका.
3) विजेच्या गळगळाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या साहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
4) उंच झाडांच्या खाली आसरा घेऊ नका.
5) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका…
6) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना बाहेर पाहू नका, हे बाहेर थांबणे इतकेच धोकादायक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news