लातूरमध्ये बसच्या धडकेत माय-लेकराचा मृत्यू

file photo
file photo

लातूर; पुढारी वृतसेवा : शहरालगत लातूर औसा मार्गावरील छत्रपती चौकात बस व दुचाकीच्या अपघातात  माय-लेकराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी (दि.१४) सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. स्वप्नाली कृष्णा जाधव (वय २८) व हर्ष जाधव (वय ७) अशी या माय-लेकरांची नावे असून पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेतले आहे.

स्वप्नाली या त्यांचा मुलगा हर्ष यास दुचाकीवरून (क्र. एम एच २४ बी एम ३७५४) शहरातील पीव्हीआर चौकातून रिंग रोडने औसा रोडकडे जात होत्या. छत्रपती चौक ओलांडून औसा रोडकडे जात असताना समोरून राजीव गांधी चौकाकडून औशाकडे भरधाव वेगात जात असलेल्या एसटी बस (एम एच १४ – बी टी – १४३४) च्या इंधन टाकीवर स्वप्नाली जाधव यांची स्कुटी आदळली. त्यामुळे स्कुटीवरील ते दोघेही पडले व एसटीच्या मागील चाकखाली सापडले दोघांनाही तातडीने राजीव गांधी चौकातील एका खाजगी रुग्णालयात व तेथून त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. मयत स्वप्नाली जाधव यांचे पती कृष्णा जाधव हे भारतीय सैन्य दलात उत्तर प्रदेश मध्ये कार्यरत आहेत. या घटनेची माहिती त्यांना देण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news