आरोपी पकडण्यास गेलेल्या जामखेड पोलिसांच्या खासगी वाहनावर जमावाचा हल्ला

आरोपी पकडण्यास गेलेल्या जामखेड पोलिसांच्या खासगी वाहनावर जमावाचा हल्ला
Published on
Updated on

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या जामखेड पोलिसांच्या खासगी वाहनावर आठ ते नऊ जणांनी गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्या. तसेच पोलिसांवर देखील हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा व मारहाण प्रकरणी आठ ते नऊ जणांविरोधात केज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढी घटना घडून देखील जामखेड पोलीसांनी प्रसंगावधान राखून फसवणूकीतील आरोपीस ताब्यात घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपी अभिषेक सावंत, ईश्वर चाळक, राहुल चाळक, सौरभ चाळक, रोहीत चाळक, मुन्ना बचाटे व इतर तीन आरोपी सर्व रा. लाहुरी. ता. केज, जिल्हा बीड आशा नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळेले माहीती आशी की फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामखेड पोलीस शोध घेत असताना त्यांना सदर आरोपी हा बीड जिल्ह्य़ातील केज तालुक्यातील आपल्या लाहुरी या गावी आला असल्याची माहिती जामखेड पोलीसांना मिळाली. त्या नुसार जामखेड पोलीस पथकातील पो हवालदार. प्रविण इंगळे, पो.शि. कुलदीप घोळवे हे खाजगी चारचाकी वाहन (क्र. एम एच १६ सी व्ही. 5555) या वाहनाने आरोपीच्या गावी लाहोरी ता. केज याठिकाणी (दि. १६) रात्री अडीच वाजता पोहचले. यावेळी त्यांनी मदतीसाठी केज पोलिस स्टेशनचे स.फौ.वाघमारे यांना देखील सोबत घेतले होते.

यावेळी गावात २० ते २५ इसम चारचाकी गाडी (क्र. एम. एच. ४४ झेड २३००) या गाडीच्या बोनेटवर केक ठेऊन वाढदिवस साजरा करत होते. यानंतर त्या ठिकाणी असलेला फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी प्रतिक भैरवनाथ चाळक रा. लाहुरी. ता. केज यास जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले व ते आरोपीस गाडीत बसवुन घेऊन जात असताना त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी आरडाओरड केली. व पोलिसांच्या वहानाचा पाठलाग करत सदरची गाडी केज शहरातील शिवाजी चौकात मध्यरात्री च्या सुमारास अडवून आठ ते नऊ जणांनी हातात दगड, लोखंडी रॉड घेऊन गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्या तसेच पोलिसांना दमदाटी व मारहाण करत गाडीतील आरोपीस बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखून सदर गाडी केज पोलीस स्टेशनला आणली.

या नंतर जामखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी ज्ञानेश्वर विठ्ठल बेल्हेकर वय ३५ वर्षे यांनी केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील आठ ते नऊ जणांविरोधात केज पोलीस स्टेशनला मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढा प्रकार होऊनही जामखेड पोलीसांनी जामखेड येथील फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपी प्रतिक चाळक यास प्रसंगावधान राखून ताब्यात घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला आणण्यात आले व अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news