परभणी : बस चालकास मारहाण भोवली; एकास दोन वर्षाचा कारावास

file photo
file photo
Published on
Updated on

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा: जिंतूर आगारातील एका बस चालकास शुल्लक कारणातून मारहाण केल्याबद्दल जिल्हा व सत्र न्यायालयाने एका व्यक्तीस दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.

याबाबतची माहिती अशी की, चारठाणा पोलीस ठाण्यात ज्ञानोबा श्रीराम पजई यांनी १७ ऑक्टोबर २०१९ रोजी एक तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी सावरगाव (ता. जिंतूर ) येथून बस घेऊन जिंतूरकडे जात असताना सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कृष्णा सचिन राठोड (रा. रायखेडा, ता. जिंतूर) याने अचानक बससमोर मोटरसायकल आडवी लावली आणि आपणास 'तू साईड का देत नाहीस?' म्हणून शिवीगाळ केली. तर बसच्या केबिनमध्ये चढून धक्काबुक्की करीत मारहाण केली असल्याचे नमूद केले आहे.

या तक्रारीच्या आधारे चारठाणा पोलिसांनी संबंधित आरोपी कृष्णा सचिन राठोड यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदान्वे गुन्हे दाखल केला होता. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप अल्लापूरकर यांनी तपास करीत न्यायालयासमोर खटला उभा केला.
जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायमूर्ती श्रीमती के. एफ. एम. खान यांच्यासमोर सुनावणीत सरकार पक्षातर्फे सहासाठी साक्षीदार तपासण्यात आले. त्यातून न्यायमूर्ती खान यांनी आरोपी राठोड दोषी ठरवून भादवी ३५३ अन्वये दोन वर्षे करावास, ३३२ अन्वये दोन वर्ष करावास, तसेच भादवी कलम ३४१ अन्वेय पंधरा दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली.

या प्रकरणात मुख्य सरकारी अभियोग्यता ज्ञानोबा दराडे, सहाय्यक संचालक अँड. सुहास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अँड. देवयानी सरदेशपांडे यांनी प्रकरणात पक्षातर्फे भक्कम बाजू मांडली. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती खान यांनी या तिन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यात दोन वर्षे करावासाची शिक्षा ठोठावली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news