सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

'विंदाचे गद्यरुप' या त्यांच्या समिक्षणात्मक पुस्तकाला पुरस्कार जाहीर
Sahitya Akademi Award
सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीरPudhari Photo
Published on
Updated on

मराठवाडा : सुप्रसिध्द मराठी समिक्षक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 'विंदाचे गद्यरुप' या त्यांच्या समिक्षणात्मक पुस्तकाला पुरस्कार देण्यात आल्याची घोषणा साहित्य अकादमीने केली आहे. रसाळ हे मराठी साहित्यसृष्टीत प्रामुख्याने समिक्षक म्हणूनच ओळखले जातात. मराठीमध्ये वाङ्मयाच्या सैद्धांतिक समीक्षेचा अभाव आहे. वाङ्मयविषयक सर्व जटिल प्रश्नांची समर्पक उत्तरे देणाऱ्या आणि वाङ्मयकृतीच्या अस्तित्वाचा आणि तिच्या सर्व घटकांच्या परस्परसंबंधाचा उचित अर्थ सांगून तिच्या मूल्यमापनासंबंधीचे योग्य निकष देणाऱ्या भूमिकेचा नव्याने शोध घ्यावा, ही प्रेरणा मराठी समीक्षेत दिसून येत नाही.

दीडशे वर्षांच्या मराठी समीक्षेच्या इतिहासात असे दोनच प्रयत्न झाले. बा.सी. मर्ढेकरांनी सर्व ललित कलांच्या आंतररचनेसंबंधीचा आपला लयसिद्धांत मांडला. त्यानंतर लगेचच विंदा करंदीकरांनी सर्व ललित कलांमधून वाङ्मयकला बाजूला काढणारा आणि वाङ्मयकलेचे वेगळे स्वरूप अधोरेखित करणारा ‘जीवनवेधी कले’चा सिद्धांत मांडला. मराठीत जशी मर्ढेकरांच्या लयसिद्धांताची दखल घेतली गेली, तशी करंदीकरांच्या जीवनवेधी कलेच्या सिद्धांताची घेतली गेली नाही. किंबहुना त्यांच्या वाङ्मयविषयक सैद्धांतिक भूमिकेची उपेक्षाच झाली. खरे म्हणजे करंदीकरांनी केवळ जीवनवेधी कलेचा सिद्धांतच मांडला नाही, तर त्यांनी हा सिद्धांत केंद्रस्थानी ठेवून समग्र काव्यशास्त्रच उभे केले. या पुस्तकातून सुप्रसिद्ध समीक्षक डॅा. सुधीर रसाळ यांनी पहिल्यांदाच विंदांच्या काव्यशास्त्राची सैद्धांतिक समीक्षा मांडलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news