परभणी | देशाच्या राजपत्रात वनामकृविच्या ५ पीक वाणांचा समावेश

शेतकऱ्यांची उन्नती साधणे शक्य होईल : कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांचे मत
Parbhani News
देशाच्या राजपत्रात वनामकृविच्या ५ पीक वाणांचा समावेश(File photo)
Published on
Updated on

परभणी: केंद्र सरकारच्या केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारसी नुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीतत्थ्या ५ पिकांच्या वाणांचा समावेश देशाच्या राज पत्रांत करण्यात आला आहे केंद्राच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने ८ ऑक्टोवर रोजी या बाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या राजपत्रात पाच वाणांमध्ये विद्यापीठ विकसीत हरभऱ्याचा परभणी चना १६, सोयाबीनचा एमएयूएस ७३१, देशी कापसावा पीए ८८३, अमेरिकन कपाशी एनएच ६७७ आणि तिथाचा टीएलटी-२० या वाणांचा समावेश आहे. या वत्पातील हरभरा, अमेरिकन कापूस आणि तिळाच्या बाणास महाराष्ट्र राज्य लागवडीकरिता प्रसारण करण्याची मान्यता देण्यात आली आहे.

सोयाबीनच्या वाणास मराठवाडा क्षेत्रासाठी लागवडीकरीता मान्यता मिळाली आहे. देशी कपाशीच्या वाण्यास दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश कर्नाक आणि तामिळनाडू राज्याकरीता लागवडीस मान्यता प्राप्त झाली आहे. या वाणांच्या समावेशामुळे या वाणांचे बिजोत्पादन हे मुख्य बिजोत्पादन साखळीमध्ये घेता येणार असल्याची माहिती, संशोधक संचालक तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ. खोजर बेग यांनी दिली.

५ वाणांची वैशिष्ट्ये 

  • हरभऱ्याचा परभणीत चना १६ वाण : हरभऱ्याचा परभणीत चना १६ वाण हे वाण विद्यापीठांतर्गत असलेल्या बदनापुर येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेला असून ती महाराष्ट्राकरीता प्रसारित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या वाणापासून सरासरीपेक्षा अधिक उत्पादन देणारा वाण असून ११० ते १५० दिवसांत परिपक्व होतो, गलरोगास प्रतिबंधक असून दाने टपोरे आहे. १०० दाण्याचे वजन २९ ग्राम भरते व या वाणावर किडींचा प्रादुर्भाव तुल्यबळ वाणांपेक्ष कमी होतो.

  • सोयाबीनचा एमएयूएस - ७३१ वाण : हा वाण लवकर येणारा असून परिपक्वतेसाठी ९४ ते ९८ दिवस लागतात. या वाणाची पाने निमपसरी, गोलाकार व मोठी असतात. शेंगाचे प्रमाण अधिक व गुड्यामध्ये शेंगा लागतात, तीन दानाच्या शेंगाची अधिक प्रमाण शेंगा फुटण्यासाठी १५ दिवसांची सहनशिलता आहे. कोरडवाहू साठी तो अधिक उत्पन्न देणारा तसेच कीड व रोगास प्रतिकारक आहे.

  • देशी कपातीचा पीए ८३३ वाण : कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयीत कापूस सुधार प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आला असून त्याची उत्पादकता १५ ते १६ क्लिंटल प्रति हेक्टरी असून रूईचा उतारा ३५ ते ३६ टक्के आहे. १५० ते १६० दिवसांचा कालावधी याला लागत असून या वाणाचे विशेष गुणधर्म म्हणजे या थाम्याची लांबी व मजबुती, रसशोषक किडी, कडाकरपा व दहीपार रोगास सहनशील तसेच पाण्याच्या ताणास देखील सहनशील आहे.

  • अमेरीकन कपाशीचा एनएच - ६६७ वाण : या वाणाची उत्पादकता १४ ते १५ किंटल प्रति हेक्टर असून रुईचा उतारा ३७ ते ३८ टक्के आहे. पाण्याच्या ताणास व रसशोषक किडीस सहनशील असून सथन पद्धतीने लागवडीस गोग्य आहे.

  • तिळाचा टीएसटी - १० वाण : विद्यापीठाच्या लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आला. यात वेलाचे उत्पादन सरस असून खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये लागवडीस योग्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागवडीकरिता शिफारस करण्यात आलेली आहे. कालावधी ९० ते ९५ दिवसांचा असून उत्पादन हेक्टरी ६ ते ७ किंटल येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news