Parbhani Youth Hunger Strike | दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सोन्ना येथे युवकाचे उपोषण

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
  Purna  Youth Hunger Strike
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ परभणी पूर्णा सोन्ना येथे युवकाचे उपोषणPudhari
Published on
Updated on

Purna Youth Hunger Strike

पूर्णा : दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ पूर्णा तालुक्यातील सोन्ना येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद कदम यांनी शुक्रवार (दि. २४) पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणासंदर्भात त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले होते.

उपोषणकर्ते गोविंद कदम यांनी निवेदनात म्हटले आहे की, नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी दिल्लीतील जंतरमंतर येथे शांततामय आंदोलन करत होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा तसेच काही विद्यार्थ्यांशी गैरवर्तन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कथित घटनेचा निषेध म्हणून आपण उपोषण सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  Purna  Youth Hunger Strike
Parbhani Youth Congress Morcha | केंद्र सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात पाथरी युवा काँग्रेसचा तहसीलवर महामोर्चा

उपोषणकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, गोविंद कदम यांनी यापूर्वीही शहीद भगतसिंग स्मारक उभारणीच्या मागणीसाठी अनेकवेळा आमरण उपोषण आणि पायी दिंडी आंदोलन केले होते. मात्र, त्या मागणीबाबत प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. आता दिल्लीतील जंतरमंतर येथील कथित घटनेच्या निषेधार्थ त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केल्याने पोलिस व महसूल प्रशासनासमोर परिस्थिती हाताळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news