Banjara reservation : बंजारा आरक्षणासाठी युवकाने विष प्राशन करून जीवन संपवले

त्याच्या खिशात आरक्षणाच्या मागणीसंदर्भातील चिठ्ठी आढळल्याने बंजारा समाजात मोठी खळबळ उडाली आहे.
Banjara reservation
Banjara reservation : बंजारा आरक्षणासाठी युवकाने विष प्राशन करून जीवन संपवलेfile photo
Published on: 
Updated on: 

Youth ends life by consuming poison over Banjara reservation

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलने सुरू असतानाच, जिंतूर तालुक्यातील पोखरणी तांडा येथे एका ३५ वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. विठ्ठल देवराव चव्हाण असे मृत युवकाचे नाव असून, त्याच्या खिशात आरक्षणाच्या मागणीसंदर्भातील चिठ्ठी आढळल्याने बंजारा समाजात मोठी खळबळ उडाली आहे.

Banjara reservation
Parbhani Charthana thefts - चारठाणा येथे एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोऱ्या, भीतीचे वातावरण

महाराष्ट्रातील बंजारा समाजाला इतर राज्यांप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी समाजाच्या वतीने लढा उभारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पोखरणी तांडा येथील विठ्ठल चव्हाण यांनी शनिवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राहत्या घरी विषारी पदार्थ प्राशन केला.

हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी चव्हाण यांना तातडीने जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले, जिथे उपचार सुरू असताना सायंकाळी सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

मृत विठ्ठल चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले (प्रीतम व तुकाराम) आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. ते भूमिहीन असून मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत। होते. कर्त्या व्यक्तीच्या आकस्मिक निधनामुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Banjara reservation
MSRTC Online Pass : एसटीचा आवडेल तेथे कोठेही पास आता ऑनलाईन

आरक्षणाची चिठ्ठी आणि आंदोलनाची दिशा

विठ्ठल चव्हाण यांच्या खिशात आरक्षणाच्या मागणीसंदर्भातील चिठ्ठी आढळून आली असून, आरक्षण मिळत नसल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यात नमूद असल्याचे समजते. या घटनेमुळे बंजारा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रविवारी (दि. ४) जिंतूर शहरात होणारी आंदोलकांची महत्त्वपूर्ण बैठक या दुर्दैवी घटनेमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news