

जिंतूर : तालुक्यातील येलदरी धरण हे मराठवाड्यातील नंबर दोनचे धरण असून सध्या धरण परिक्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने व बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव तालुक्यातील खडकपूर्णा धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सध्या येलदरी धरणात 98.05 टक्के पाणी साठा झालेला आहे.
दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:00 वा.येलदरी धरणाचे दोन गेट 0.5 मी.ने उघडण्यात आले असून त्या द्वारे 4219.94 कुसेक्स इतका विसर्ग पूर्णा नदी पात्रात सोडण्यात आला.
धरणात पाण्याची होणारी आवक पाहता पाण्याचा विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल तेंव्हा पूर्णा नदी काठच्या गावानी सतर्क राहावे अश्या सूचना येलदरी धरण पूर नियंत्रण कक्षाने कळविले आहे.