Parbhani Municipal Corporation | परभणीत उबाठाचा मुस्लिम महापौर, काँग्रेसचा हिंदू उपमहापौर

व्हिप, बैठक अन् गणित जुळले; शिवसेनेवर हिंदुत्वाला मूठमाती दिल्याचा भाजपचा आरोप
Parbhani Municipal Corporation
Parbhani Municipal Corporation | परभणीत उबाठाचा मुस्लिम महापौर, काँग्रेसचा हिंदू उपमहापौरFile Photo
Published on
Updated on

परभणी : महापालिकेच्या महापौरपदी उद्धव सेनेचे (उबाठा) सय्यद इक्बाल यांची, तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या गणेश देशमुख यांची निवड झाली. यानंतर परभणीत शिवसेना-काँग्रेस आघाडीकडून जल्लोष सुरू आहे. रस्त्यावर भगवा आणि हिरवा गुलाल, फटाके फोडून आनंद साजरा केला जात असतानाच भाजपने मात्र पुन्हा शिवसेनेवर हिंदुत्वाला मूठमाती दिल्याचा आरोप केला आहे.

खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील हे हिंदुत्ववादी मतांवर गेल्या अनेक वर्षांपासून निवडून येत आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाला पसंती देत याच परभणीकरांनी पक्षाला मान्यता आणि चिन्ह मिळवून दिले होते. मात्र, याच परभणीत सत्तेसाठी उद्धव ठाकरेंच्या सेनेने मुस्लिम महापौर करत आम्हाला हिंदुत्वाशी काही देणेघेणे नाही हे कृतीतून दाखवून दिले आहे. भविष्यात परभणीतील हिंदुत्ववादी जनता उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत कधीही जाणार नाही. परभणीत मुस्लिम महापौराची निवड करून उबाठा गटाने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की त्यांची शिवसेना आता जनाब सेना झाली आहे. सत्तेसाठी भगवा सोडून हिरवा हाती घेतला, बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली, असा आरोप भाजपने केला आहे.

चंद्रपूरचे पडसाद परभणीत...

परभणी महापालिकेत उद्धव सेनेचे 25, तर काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आले होते. बहुमतासह आघाडीने सत्ता मिळवल्यानंतर प्रत्यक्षात महापौर, उपमहापौर पदासाठीची निवडणूक झाली. चंद्रपूर महापालिकेत उद्धव सेनेच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. या जोरावर तिथे भाजपने आपला महापौर केला. याचे पडसाद परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत उमटेल, असा दावा केला जात होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news