

शहरात गेल्या तिन दिवसापासून मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी सलग धुमाकूळ घालत परवानाधारक देशी दारु दुकाने फोडण्याचे लक्ष केले आहे. पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील टिळकरोड येथील बसंतलाल जैस्वाल यांच्या नावे असलेल्या परवानाधारक देशी दारुचे दुकान २१ जून रोजी रात्री उशिरा फोडून नगदी ९६ हजार रुपये लंपास केल्याची घटना ताजी आहे.
यातच पून्हा २२ जून रोजी मध्यरात्रीनंतर दुसऱ्या रात्रीच रेल्वेस्टेशन रोड महाविरनगर येथे आनंद आजमेरा यांचे व ताडकळस रोडवरील शासकीय ग्रामीण रुग्णालयाजवळील वसंत कंट्रीलिकर शाप देशी दारुचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी काही नगदी रुपये लंपास केल्याची घटना घडली; तसेच तेथील पानटप-या फोडल्या ईंडियन आईल पेट्रोलपंपावर,साबणे धाबा येथे देखील धुडगूस घालीत चोरीचा प्रयत्न केला.
त्याच बरोबर तिस-या दिवशी २२ जून रोजी रात्रीही सिदार्थनगरातील महिला पोलिस कर्मचारी वैशाली पुंडगे ह्या कुटूंबायासह घराच्या गेटला व आतील दरवाजाला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या घरी कोण्ही नाही याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश करीत आतील कपाट व ईतर सामान उघडून नगदी रुपये आहेत का ते पाहून सामन अस्तव्यवस्त फेकून देत पोबारा केल्याची देखील घटना झाली.
या चोरट्यांनी तेथील आजूबाजूची शुध्दा घरे फोडण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते. दरम्यान, देशी दारु दुकानदार व ज्यांच्या घरे फोडली त्या मालकांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली.त्यावरुन पूर्णा पोलिस अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत होते.शहरात गेल्या काही दिवसापासून चो-यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्याने पोलिसासमोर चोरट्यांनी अवाहन उभे केले आहे.
गत तिन दिवसापासून पूर्णा शहरात चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास धुडगूस घालून देशी दारुची दुकाने फोडणे तसेच काही नागरीकांच्या खाजगी घरी चोरी करणे रात्रभर शहरात अंधाराचा फायदा घेवून चो-या करण्यासाठी फिरणे असे गुन्हेगारी कृत्य करणे चालूच ठेवून २१ जून रोजी रात्री उशिरा टिळकरोड येथील निलेश जैस्वाल यांचे परवानाधारक देशी दारुचे दुकान फोडून ९६ हजार रुपये लंपास केले होते.
त्यानंतर या चोरट्यांना पकडयासाठी पोलीसांना यश न आल्यामुळे ते निर्ढावून जात पुन्हा दुसऱ्या दिवसाच्या रात्रीपासून चो-या करण्यासाठी सक्रिय झाले. हि भुरट्या चोरट्यांची एक टोळीच सक्रिय असू शकते.
पहिल्या रात्रीच्या चोरीचे निलेश जैस्वाल यांच्या देशी दारु दुकानात चोरी करतानाचे सिसिटीवी फुटेजही मिळाले तरी सदर चोरटे उजळ माथ्याने चोरीच्या घटना घडवतच आहेत. यामुळे पूर्णा शहरातील पुरुष महिला नागरीक रात्रीच्या वेळी भयभीत होताहेत.शिवाय शहरात अनेक ठिकाणी अवैध देशी दारु दिवसा असो की रात्री कोणत्याही वेळी सहज उपलब्ध होत असल्याने तरुण वर्ग दारुच्या व्यसन जडल्याने गुन्हेगारीकडे वळत असल्याचे बोलले जात आहे.