

shop burnt due to short circuit
पूर्णा : शहरातील स्टेट बँके शेजारील एक चहाचे दुकान सोमवारी रात्री शॉटसर्किटमुळे जळून खाक झाले. यात विविध साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून जळाले. घटनेत सुमारे तीन लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेसंदर्भात अधिक माहिती अशी की, पूर्णा शहरातील स्टेट बँक शेजारी एका दवाखान्या शेजारी मेडीकल जवळ उमेश कोटूरवार यांची ग्रॅज्युएट गुळाचा चहा दुकानाची शाखा आहे. ते सोमवारी दिवसभर व्यवसाय चालवून दुकान बंद करुन घरी गेले होते.
रात्री ९ ते ९:३० च्या दरम्यान त्यांना तुमच्या दुकानात धुर निघून दुकानात आग लागल्याचे शेजारील लोकांनी कळवले. तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाहीले तर दुकानातून आगीचे लोळ निघून जळत होते. इतक्यात अग्नीशमक बंबला तात्काळ बोलावून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला.
या दुकानात विद्यूत मीटर बसविण्यात आलेल्या फ्यूजमध्ये शॉटसर्किट घडून आग लागल्याचे निर्दशनास आले. आगीत खुर्च्या, टेबल,पंखे कुलर,फ्रिज,गुळ चहापत्ती,फ्रिज,बॅनर व नगदी रुपये जळाले. यामध्ये सुमारे तीन लाख रुपये आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती उमेश कोटूरवार यांनी दिली.
दरम्यान, सोमवारी दिवसभर विद्यूत पुरवठा सातत्याने चालू बंद होत होता. त्यामुळे विद्यूत पुरवठ्याचे व्होल्टेज वाढून शॉट सर्किट झाला असावा?असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळास पोनि विलास गोबाडे यांनी भेट देवून पाहणी केली. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात येत आहे.