लोहा : पुढारी वृत्तसेवा लोहा शहरात मागच्या काही महिन्यांपासून प्रशासकराज चालू असल्यामुळे शहरात नगरपालिका प्रशासनाचा कारभार ढेपाळला आहे. शहरांमध्ये सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून हे कुत्रे कळपा- कळपाने शहरात फिरताना दिसत असून त्यामुळे सणासुदीच्या काळात महिला मुलांना याचा त्रास होत आहे. मोकाट कुत्र्याचं बंदोबस्त करावा अशी मागणी महिला वर्गातून करण्यात आलेली आहे.
पडघम वाजल्याने उमेदवारी दाखल दिवाळी सणानिमित्त महिला लहान मुलांची मोठ्या संख्येने शहरात खरेदीसाठी झुंबड उडालेली असताना व विधानसभा निवडणुकीचे नगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी महिला वर्गातून करण्यात आलेली आहे. करण्यासाठी दररोज विविध इच्छुकांचे समर्थक कार्यकर्ते शहरात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने येत आहेत. परंतु शहरात सर्व कारभार आलबेल असल्याचे दिसत असून शहरात लघुशंकेसाठी कुठेही जागा नाही. लोक रस्त्यावरच उघड्यावर लघुशंका करताना दिसत असून त्यासोबतच अनेक ठिकाणी कचऱ्यांची ढिगारे साचलेले दिसत आहेत. दिवाळीच्या काळात महिला व लहान मुले खरेदी करण्यासाठी बाज- बाजारात येत आहेत. त्यांना मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.