

Soybean Crop Damage
पूर्णा : तालूक्यातील शेतशिवारात मागील खरीप हंगाम २०२४ मध्य १९ ते २१ अक्टोबर रोजी अतिवृष्टी होवून काढणीपश्चात सोयाबीन पीक पाण्याखाली जावून बाधीत झाले होते. सदर पिक नूकसानीची काही शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत आय सी आय सी आय लोंबार्ड पीक विमा कंपनी थ्रो पोर्टलवर आँनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या वरुन सदर पीकविमा कंपनी प्रतिनिधिने नुकसानीत सोयाबीन पिक स्पॉट स्थळाचा सर्वे करुन तसा नुकसानग्रस्त अहवाल आयसीआयसीय आय लोंबार्ड पीक विमा कंपनीकडे दाखल केला होता. सुरुवातीला पोस्ट हार्वेस्ट क्लेम पीक विमा कंपनीनी रिजेक्ट केला होते. परंतू प्रत्यक्षात काढणीपश्चात सोयाबीन पीक नुकसान झाले असल्यामुळे त्याची भरपाई देण्यासाठी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आ राजेश विटेकर यांनी शासनदरबारी आवाज उठवून ह्या तक्रारी ग्राह्य धरल्या गेल्या.
कृषीमंत्र्यांनी त्या मंजुरीस दिल्या. काढणीपश्चात सोयाबीन पीकाची नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने १ हजार कोटी रुपये निधी देखील आयसीआयसिआय विमा कंपनीला दिला. त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या (पिएम एफबीवाय पोर्टलवर बाधीत शेतकऱ्यांच्या पॉलिसीनंबर नुसार पोस्ट हार्वेस्ट (काढणीपश्चात बाधीत क्षेत्राप्रमाणे) नुकसान भरपाई मंजूर देय रक्कम चढवली गेली. भरपाई रक्कम अदा करण्यासाठी क्लेम स्टेट्स अक्सेप्ट ही केले. ही प्रक्रिया पिएम एफबीवाय पोर्टलवर मागील दहा दिवसांपासून दाखवत आहे. परंतू, विमा कंपनीने अद्यापही पोस्ट हार्वेस्ट (काढणीपश्चात)ची नुकसान भरपाई सबंधीत शेतकऱ्यांच्या अधारबेस डिबीटी सलेक्ट बँक खात्यावर वर्ग केली नाही.
भरपाई रक्कम आज जमा होईल उद्या होईल म्हणून शेतकरी प्रतिक्षा करुन कंटाळून गेलेत. तरी शुध्दा सदर पिक विमा कंपनी भराई का ट्रान्स्फर करीत नाही याचे गौडबंगाल काय आहे?हे कळायला मार्ग नाही.दरम्यान,पावसाळी अधिवेशनात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर काढणीपश्चात नुकसान भरपाई जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र शासन व आयसीआयसीआय विमा कंपनी कमालीची दिरंगाई करीत आहे. याकडे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी लक्ष घालावे अशी मागणी शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.