Parbhani ZP Election Result | पूर्णा तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाचा ३ जागांवर विजय; पं. स.च्या ४ जागांवर भाजपची बाजी

जिल्हा परिषद गटात उबाठा शिवसेना ३, भाजप १, राष्ट्रवादी १ व १ अपक्ष विजयी, पंचायत समितीच्या १२ गणांत भाजप ४, उबाठा शिवसेना ३, यशवंत सेना २, राष्ट्रवादी १ व अपक्ष २
Purna Taluka Election Result
Purna Taluka Election ResultPudhari
Published on
Updated on

Purna Taluka Election Result

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. या निवडणुकांची मतमोजणी सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडली. मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

जिल्हा परिषद गटांचे निकाल

एरंडेश्वर जिल्हा परिषद गटातून उबाठा शिवसेनेचे रितेश काळे यांनी ३२३ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. त्यांना ६,६५६ मते मिळाली, तर भाजपच्या डॉ. स्मिता कदम यांना ६,३३३ मते मिळाली.

Purna Taluka Election Result
Parbhani News : मिनी मंत्रालयासाठी सरासरी ७१ टक्के मतदान

चुडावा गटातून भाजपचे भरत घनदाट हे ४,८३० मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांना ९,०४८ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक धुतराज यांना ४,२१८ तर उबाठा शिवसेनेचे गोरखनाथ भालेराव यांना २,७१४ मते मिळाली.

कावलगाव गटातून अपक्ष उमेदवार अर्चना उत्तम ढगे यांनी ७७७ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. त्यांना ७,३३६ तर भाजपच्या उज्वला नागेश्वर यांना ६,५५९ मते मिळाली.

गौर गटातून राष्ट्रीय काँग्रेसच्या कोमल गंगाधर पारवे यांनी ३८७ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. त्यांना ६,४५९ मते मिळाली. यशवंत सेनेच्या गयाबाई बाबाराव माठे यांना ६,०७२ तर भाजपच्या शीतल खटिंग यांना ४,२०० मते मिळाली.

ताडकळस गटातून उबाठा शिवसेनेच्या केशरबाई गंगाधर जल्हारे यांनी १,३९६ मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांना ५,९९९ मते मिळाली. भाजपचे केदार स्वामी (४,६०३), अपक्ष डॉ. भारत नांदुरे (२,०३९), शिवसेनेचे रामलिंग स्वामी (१,०४३) व राष्ट्रवादीचे सुरेश मगरे (७९०) यांना अनुक्रमे मते मिळाली.

वझूर गटातून उबाठा शिवसेनेच्या बेबीताई शिवाजीराव कुकर यांनी १,६७८ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उर्मिला बनसोडे यांना ४,६७२ तर स्वाभिमानी पक्षाच्या रसिका ढगे यांना ४,२६१ मते मिळाली.

Purna Taluka Election Result
Parbhani News : 680 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम बंद होणार

पंचायत समिती गणांचे निकाल

बारा पंचायत समिती गणांतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे —
एरंडेश्वर : कान्हूपात्रा प्रदीप चापके (उबाठा शिवसेना) – २,६९६ मते
आहेरवाडी : शकुंतला कृष्णा बोबडे (भाजप) – ३,१९९ मते
चुडावा : प्रियंका प्रशांत गच्चे (भाजप) – ३,४४३ मते
देगाव : विलास बळीराम गिरी (राष्ट्रवादी) – २,७५३ मते
कावलगाव : उज्ज्वला नारायण पिसाळ (अपक्ष) – ३,८६० मते
धानोरा मोत्या : मिरा शिवाजी खैरे (अपक्ष) – ३,४७७ मते
गौर : नरेश जोगदंड (यशवंत सेना) – २,३४९ मते
ध. टाकळी : गोविंद सूर्यवंशी – ३,५८५ मते
ताडकळस : ज्ञानोबा घोडके (भाजप) – ३,५४३ मते
फुलकळस : काशीनाथ काळबांडे (उबाठा शिवसेना) – २,८०७ मते
वझूर : चंद्रकांत पवार (उबाठा शिवसेना) – ३,६०६ मते
देवूळगाव दुधाटे : प्रभावती दुधाटे (भाजप) – ३,२४२ मते

निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news