

सेलू : सेलू तालुका कृषी कार्यालयाला मागील दीड ते दोन वर्षापासून कायमचा कृषी अधिकारी नाही. या कार्यालयाचा कारभार प्रभारीवर चालत आहे. त्यातच अधिकारी नसल्यामुळे अनेक दिवसापासून शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. अगोदरच दुष्काळात अडकलेला शेतकरी या कार्यालयात चकरा मारून बेजार झाला आहे.
काही शेतकऱ्यांनी शिवसेना नेते जयसिंग शेळके यांना फोन करून या कार्यालयात जबाबदार अधिकारी नाही व ज्वारीची हरभऱ्याची बियाणे आली आहेत असे सांगितले व कार्यालयात गेलो असता तिथे जबाबदार अधिकारी नव्हता याचा निषेध म्हणून कृषी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला संतप्त शेतकऱ्यांच्या वतीने हार घालून निषेध करण्यात आला.
यावेळी जयसिंग शेळके, वैभव वैद्य, दत्ता आंधळे, डॉ विजय काकडे, श्याम बोडखे, अशोक बोराडे,शिवाजी राऊत, कृष्णा आंधळे, परमेश्वर साखरे, भागवत राऊत, हरी बोडखे, गणेश आंधळे, नागेश आंधळे, मंचकराव काकडे, बाबासाहेब काकडे, राजेश वायगुंडे, अशोक साखरे व अनेक शेतकरी उपस्थित होते.