

पूर्णा : तालूक्यातील ताडकळस खडाळा गावाच्या अलीकडे पांदण रस्त्यावर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार स्थागुशा पोलीस पथकाने ता १५ ऑगस्ट रोजी रात्री ००:३० वाजता सापळा रचला होता. यावेळी एका कारला थांबवून तिच्यातील बंदी असलेला अवैध गुटखा पुड्या गट्ठे पकडण्यात आले.
यात, १,३०,६८० रुपये किंमतीचा ज्यात केसरयुक्त विमल पानमसाला चे ६६० पुडे, १३७२८ व्ही १ तंबाखू किंग पॅक असलेले ६२४ पुडे,६७५०० रुपये किंमतीचा राजनिवास सुगंधित पान मसाला असलेले ४५० पुडे,जाफरानी जर्दा तंबाखू, झाडाझडती केली असता आढळून आले. तसेच तस्करी करताना वाहतूक करणारी विनानंबर सिल्व्हर रंगाची जुनी कार किंमत ४ लक्ष असा एकूण ६,७९,४०८ लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी ताडकळस पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.पोलिस पथक दिसताच वाहनचालक अंधाराचा फायदा घेत पसार झाले. सदरील कार्यवाही स्थागुशाचे परभणी ग्रामीण पोलीस पथकाचे ए पी आय जायभाये, गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी दिपक मुदीराज, यशवंत वाघमारे, रवि जाधव, नामदेव धोत्रे, शरद सावंत यांनी केली.
पूर्णा रेल्वे स्टेशनवर आढळून आला ईसमाचा मृतदेह
येथील रेल्वे स्टेशन स्थानकावर फलाट क्रमांक २ व ३ भागात एका ४० ते ४५ वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह ता १५ ऑगस्ट रोजी आढळून आला. दरम्यान, रेल्वे लोहमार्ग पोलीसात घटनाप्रकरणी ए डी दाखल करण्यात आली आहे. सदर मयत ईसमाचे वय अंदाजित ४० ते ४५ वर्षाचे असून सडपातळ बांधा, उंची १६५ सेंमी,सावळा रंग गोल चेहरा, लांब केस काळे,मोठे नाक,अंगात काळी हाफ पँट,पांढरी मळकट बनीयन घातलेली आहे. अशा वर्णनाचा मयत ईसम असून त्याची ओळख पटवण्याचा तपास पोलीस करत आहेत.
झिरोफाटा टोलनाक्याजवळ आयशर -दुचाकीचा भिषण अपघात; मोटारसायकल स्वार ठार
पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा ते परभणी रोडवर असलेल्या टोलनाक्याजवळ ता १५ ऑगस्ट रोजी रात्री आयशर व दुचाकीस्वाराची जोरदार धडक होऊन भिषण अपघात झाला.या दुर्घटनेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली.सदरील घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव अनूप अजित होरो वय २३ रा कथकुवारी पो महुगाव जि रांची झारखंड असं आहे. सदरील घटना प्रकरणी पोनि सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सपोनि गजानन पाटील करीत आहेत.