Parbhani news | पूर्णा पालीकेतील बंद सिईओ कॅबिनला पुष्पहार अर्पण करुन निषेध

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रंगरंगोटी केली नसल्याचा संताप व्यक्त
Parbhani news | पूर्णा पालीकेतील बंद सिईओ कॅबिनला पुष्पहार अर्पण करुन निषेध
Published on
Updated on

पूर्णा : येथील नगरपरिषद कार्यालयातील सिईओ डॉ. उत्कृष्ट गुट्टे हे शिवजन्मोत्सव सोहळ्यास गैरहजर राहिले. लेखी निवेदन सादर करुनदेखील व्यवस्थितपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रंगरंगोटी करुन सुशोभीकरण केला नाही. याचा जाब विचारण्यासाठी ता. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी शिवप्रेमींनी पालिका कार्यालय गाठले. तेव्हा तिथे सिईओ अनुपस्थित आढळून आले.

दरम्यान, संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी बंद सिईओ केबिनला पुष्पहार अर्पण करुन जाहीर निषेध केला. महाराष्ट्राचे आराध्यदैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा (ता.१९ फेब्रुवारी) साजरा करावयाचा होता. त्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी ज्ञानोबा कदम, विष्णू कदम, पद्माकर पांचाळ, अंगद कदम, सचिन, संदीप, त्र्यंबक कदम या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पुतळा व परिसर रंगरंगोटी, विद्युत पथदिवे, रोषणाई करण्यासाठी नगरपालीकेला अर्ज विनंती केली होती.

परंतु,पालीकेकडून छत्रपती शिवरायांचा पुतळा रंगरंगोटी व सुशोभीकरण केलेच नाही. पथदिवे,विद्यूतरोषणाई बसवली नाही.फक्त छत्रपती पुतळा स्मारक कंपाऊंड वाललाच रंगोटी करुन समज काढली. त्यामुळे छत्रपती शिवरायांप्रति सिईओला कोणतीही काळजी अथवा गांभीर्य नसल्यामुळे क्रोधित झालेले शिवप्रेमी त्यांना भेटून जाब विचारणार होते. मात्र ते कार्यालयात गैरहजर असल्याचे दिसून आले. शिवजयंती साजरी करायलाही हजर राहिले नाही. त्यामुळे पालीका सिईओ किती बेशिस्त आहेत? याचा प्रत्यय आल्याने पालीका प्रशासनाविरुध्द उपस्थित शिवप्रेमींनी एल्गार पुकारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news