Parbhani News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

परभणी तालुका काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
Parbhani News
Parbhani News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्याfile photo
Published on: 
Updated on: 

Provide aid of 50,000 per hectare to drought-affected farmers

परभणी, पुढारी वृत्तसेवा : परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या हक्कांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, या उद्देशाने परभणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी (दि.१५) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले.

Parbhani News
Parbhani News : तलावांतील अनधिकृत उपशावर पथकाची नजर

या आंदोलनाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. यासोबतच मतदान प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत, मुख्य निवडणूक आयुक्तांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी परभणी तालुका काँग्रेस कमिटीने हे आंदोलन आयोजित केले. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याच्या मागणीवर शासन काय भूमिका घेते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले या धरणे आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शेख सलमान शेख युनुस,

आशिष हरकळ, जितेंद्र देशमुख, शेख नासेर, अमोल जाधव, गणेश घाडगे, गुलमीर खान, सुनील बाबा देशमुख, इसान हुसेनी, सुहास पंडित, ज्ञानेश्वर वाघमारे, शेषराव देंडगे, प्रसाद डुकरे, बालासाहेब सामाले, शेख मुजमील, सय्यद महाराज, अरुण गव्हाणे, करण कांबळे, दीपक पवार, अशोक पवार, विष्णू गायकवाड, निखिल मांडे, मारोती नंद, विनोद कांबळे, बाबासाहेब खरात, दीक्षा धरणे आंदोलन आनेशकुमार राजीनामा द्या।

Parbhani News
Parbhani Farmer Death | सततची नापिकी आणि कर्जाच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने जीवन संपविले

तालुका काँग्रेस कमेटा शेळके, अलका भालेराव, सोनाली भालेराव, आम्रपाली शिंदे, मंगल गरुड, शोभा सोनकांबळे, विजयमाला दहे, पद्मावती शिसोदे, जानवी दहे, नाझिमा अन्सारी, मोबिन खुरेशी, युसुफ खान यांच्यासह शेतकरी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेसतर्फे राष्ट्रपतींना निवेदन गंगाखेड: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा घ्यावा, एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि सरकार जनता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, या मागण्यांसह गंगाखेड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

निवेदनात निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत, एसआयआर प्रक्रियेद्वारे जात व धर्माच्या आधारावर मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्तांची तत्काळ हकालपट्टी करून प्रक्रिया मागे घेण्याची केली. मराठवाड्यातील शेतकरी खरीप हंगामातील दुष्काळामुळे संकटात सापडले असून, पिके करपल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र, 'ट्रिगर-१'च्या निकषांमुळे शेतकऱ्यांना मदत नाकारली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याऐवजी दिवाळीसाठी ५ हजार रुपये देण्याची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे सांगत, फडणवीस सरकारच्या भूमिकेचा गंगाखेड तालुका काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध केला. वरील मागण्यांची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करा अन्यथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारच्या जन विरोधी धोरणा विरोधात आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी गंगाखेड कॉग्रेस कमीटी तालुकाध्यक्ष रमेशराव पवार, सुरेश इखे, कुंभार, वंचित बहुजन आघाडीचे आकाश पारवे, अॅड लक्ष्मण केंद्रे, डॉ शैलेश कदम, सिध्दोधन भालेराव, वामन ढोबळे, शिवाजी घोबाळे, सुभाष शिंदे, केदार शेटे, बालासाहेब कुगे, मंचक पवार यासह कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news