Parbhani News : परभणीत शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीची शक्यता

विधान परिषद निवडणूक : भाजप-राष्ट्रवादीमध्येही उमेदवारीवरून रस्सीखेच
Parbhani News
Parbhani News : परभणीत शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीची शक्यताPudhari Photo
Published on
Updated on

Possibility of a Shiv Sena vs. Shiv Sena battle in Parbhani

परभणी, पुढारी वृत्तसेवा : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारी मिळवण्यावरून जोरदार चुरस निर्माण झाली असून महाविकास आघाडीकडून परभणीची जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडण्यात आल्यामुळे परभणीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी शक्यता निर्माण झाली आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेसची जागा असलेल्या या जागेवर भाजपाने जोरदारपणे दावेदारी केली असून महायुतीतील भाजप व राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस पहावयास मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना परभणीतील इच्छुक उमेदवारी मिळविण्यासाठी मुंबईत तळ ठोकून बसल्याचे समजते.

Parbhani News
Parbhani Hingoli MLC Election : ठाकरे सेनेकडून डॉ. नावंदर रिंगणात उतरणार

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत २०१८ साली एकसंघ असलेल्या शिवसेनेकडून अकोल्याच्या विप्लव बाजोरिया यांनी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांचा पराभव करत विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत परभणीची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटल्याची चर्चा असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपकडून उमेदवारीसाठी दावेदारी केली जात आहे.

महायुतीतील तिन्ही पक्षांकडे विधान परिषदेच्या जागेसाठी एकापेक्षा अनेकजण इच्छुक आहेत. यामुळे पक्षांतर्गतच स्पर्धाही तीव्र झाली आहे. ही जागा शिवसेनेला सुटल्यास आ. विप्लव बाजोरिया, अभिमन्यू खोतकर, सईद खान, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्यासह हिंगोलीतूनही काही इच्छुक नावे पुढे येत आहेत.

Parbhani News
Nanded legislative council election : वि.प.निवडणूक : महायुतीत नांदेडची जागा भाजपाला सुटल्यातच जमा!

राष्ट्रवादीकडून प्रामुख्याने माजी आ. विजय भांबळे, डॉ. अंकुश लाड, पंकज आंबेगावकर, दिलीप चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राजेश विटेकर यांनी विजय भांबळे यांच्या उमेदवारीसाठी जोर लावल्याची माहिती आहे. माजी आ. भांबळे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढे आल्यानंतर भाजपची नेते मंडळीही उमेदवारीसाठी सरसावल्याचे दिसून आले.

पालकमंत्री बोर्डीकर यांच्या नेतृत्वात भाजप शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत परभणीची जागा भाजपला सोडण्याची मागणी केली. एकंदरीत तरी आजघडीला परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिव-सेना अशी लढत होण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.

ऐनवेळी दुर्राणी यांना घ्यावी लागली होती माघार

२०१८ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसेकडून तत्कालीन जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. बाबाजानी दुर्राणी हे विधान परिषदेची निवडणूक लढणार होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काहीकाळ अगोदर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुर्राणी यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थांबा, असे सांगितले होते. बाबाजानी दुर्राणी यांनी पक्ष नेतृत्वाचा आदेश शिरसावंद्य मानल्यामुळे त्यांना अवघ्या काही महिन्यांच्या आत विधान परिषदेवर घेण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news