Purna Crime | पूर्णा शहरातून पिकअप गाडी चोरीला; चोरट्यांचे पोलिसांना आव्हान

धाब्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा प्रकार कैद
Purna city vehicle theft
Purna city vehicle theftPudhari
Published on
Updated on

Purna city vehicle theft

पूर्णा : पूर्णा शहरातील बोर्डीकर प्लॉटिंग परिसरातून रोडलगत उभी केलेली पिकअप चारचाकी मालवाहू गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही चोरी बुधवारी (दि. ४) मध्यरात्री घडली असून गुरूवारी (दि. ५) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबिकानगर येथील रहिवासी रामकिशन बाबूराव जोगदंड हे वाहतूक व्यवसाय करतात. त्यांनी बुधवारी रात्री एमएच २२-२८९४ क्रमांकाची मॅक्स पिकअप मालवाहू गाडी बोर्डीकर प्लॉटिंगमधील श्री संतसेना महाराज मंदिराजवळील कॉलनी रस्त्यावर उभी केली होती. त्यानंतर ते घरी गेले.

Purna city vehicle theft
Parbhani News : झरी येथे आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मालवाहतुकीसाठी गेले असता गाडी उभी केलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. त्यांनी ओळखीच्या व्यक्तींना चौकशी केली; मात्र कोणीही गाडी नेली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गाडी चोरीला गेल्याचे लक्षात आले.

यानंतर जोगदंड यांनी जवळील हिरो मोटारसायकल शोरूममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये ४ फेब्रुवारीच्या रात्री सुमारे १ वाजल्यानंतर अज्ञात व्यक्ती पिकअप गाडी चालवत नेताना दिसून आली. पुढे पवार खानावळ धाब्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही हा प्रकार कैद झाला आहे. मात्र गायकवाड पेट्रोल पंपावरील कॅमेऱ्यात गाडी दिसून न आल्याने ती देगाव रोड मार्गे नेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Purna city vehicle theft
Parbhani Accident : येलदरी पुलावर काळजाचा थरकाप! पिकअप नदीपात्रात कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू

या प्रकरणी मोटारमालक रामकिशन जोगदंड यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सुमारे अडीच लाख रुपये किमतीची पिकअप गाडी चोरीला गेल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

पूर्णा शहरात वाहन चोरी व जनावरांच्या चोरीच्या घटनांत वाढ होत आहे. संबंधित परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी.

- राजू नारायणकर, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news