परभणी : उसने घेतलेले पैसे परत का देत नाही या कारणावरून एका २४ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि.२) रात्री ८ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव समी येथे घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्याात एकावर खुनाचा गुन्हा दाखल झाला.
विठ्ठल सुदामराव टापरे यांनी पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विठ्ठल टापरे यांचे भाऊ अर्जुन सुदामराव टापरे (वय २४) असे मयताचे नाव आहे. मयत अर्जुन याने त्याचा मित्र साईनाथ विठ्ठलराव मोरे याच्याकडून काही रक्कम उसनी घेत लेली होती. या उसन्या घेतलेल्या रकमेच्या वादातून साईनाथ मोरे याचा गावातीलच अर्जुन याच्यासोबत वाद झाला होता. या वादातूनच साईनाथ याने अर्जुन याच्या पोटावर चाकूने सपासप वार केले.
यात गंभीर जखमी झालेल्या अर्जुन याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले होते पण त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधितावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे, निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी भेट दिली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.