गंगाखेड : गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.४) रोजी एकूण १३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. परिणामी आता १२ उमेदवार निवडणुकीच्या अंतिम रिंगणात आहेत. दरम्यान भगवान सानप, बालासाहेब निरस व श्रीकांत भोसले यांनी निवडणुकीतील माघार घेतली आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २५ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. उमेदवारी परत घेण्याच्या अंतिम दिवशी अर्थात सोमवारी १३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये मदन रेनगडे पाटील, कदम संजय साहेबराव, कदम स्मिता संजय, जलील गुलाब पटेल, जोगदंड मुंजाजी नागोराव, प्रवीण गोविंदराव शिंदे, बालासाहेब हरिभाऊ निरस, भगवान ज्ञानोबा सानप, लक्ष्मण शंकरराव शिंदे, विशाल बबनराव कदम, गिरीन बेगम मोहम्मद शरीफ, शेख हबीब शेख रसूल, श्रीकांत दिगंबर भोसले यांचा समावेश आहे.(Maharashtra assembly poll)
परिणामी निवडणूक रिंगणात विशाल विजयकुमार कदम (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), देशमुख रुपेश मनोहरराव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), माधव सोपानराव शिंदे ( राष्ट्रीय मराठा पार्टी ), गुट्टे रत्नाकर माणिकराव ( राष्ट्रीय समाज पक्ष ), विठ्ठल जिवनाजी रबदडे ( जनहित लोकशाही पार्टी ), सिताराम चिमाजी घनदाट ( वंचित बहुजन आघाडी ), अलका विठ्ठल साखरे (अपक्ष ), नामदेव रामचंद्र गायकवाड (अपक्ष), भोसले विष्णुदास शिवाजी (अपक्ष ), विठ्ठल सोपान निरस (अपक्ष), विशाल बालाजीराव कदम (अपक्ष ), ॲड. संजीव देवराव प्रधान (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.
गंगाखेड विधानसभा मतदार संघात एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे (रासप- महायुती पुरस्कृत), विशाल कदम ( शिवसेना ठाकरे गट+ महाविकास आघाडी), सिताराम घनदाट (वंचित बहुजन आघाडी) व विठ्ठल रबदडे ( जनहिता लोकशाही पार्टी) या चौघात चौरंगी लढत होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.