Parbhani Unseasonal Rain |अवकाळीचा ताडकळस परिसराला तडाखा; काढणीला आलेला घास हिरावला

हरभरा आणि गहू पिकाचे मोठे नुकसान; बळीराजा पुन्हा एकदा संकटात
Tadkals crop damage news
काढणीला आलेला हरभरा आणि गहू भिजल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले Pudhari
Published on
Updated on

Tadkals crop damage news

ताडकळस : रब्बी हंगामातील पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा आपला लहरीपणा दाखवला आहे. ताडकळस परिसरात सायंकाळी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला हरभरा आणि गहू भिजल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वर्षभर रक्ताचे पाणी करून पिकवलेले पीक डोळ्यादेखत मातीमोल होण्याची भीती निर्माण झाल्याने परिसरात चिंतेचे सावट आहे.

हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावला

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला होता. ढगाळ हवामानामुळे शेतकरी धास्तावलेला असतानाच, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीसाठी तयार असलेला गहू अनेक ठिकाणी जमिनीवर आडवा झाला आहे, तर कापून ठेवलेला हरभरा पूर्णपणे भिजला आहे. पिकात पाणी साचल्याने दाण्यांचा दर्जा खराब होणे, हरभऱ्याला मोड फुटणे आणि उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tadkals crop damage news
Unseasonal rain parbhani | अवकाळी पावसाची पूर्णा परिसरात हजेरी; रब्बी हंगाम धोक्यात, शेतकरी चिंतेत

खर्चाचा डोंगर आणि उत्पन्नाची चिंता

यावर्षी बियाणे, खते आणि मजुरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला होता. मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी पीक उभे केले होते. मात्र, झोडपणीपूर्वीच पावसाने फटका दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. बाजारात आधीच भाव स्थिर नसताना, आता मालाची प्रत घसरल्यास मिळणारा भावही कमी होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

"वर्षभर काबाडकष्ट करून पीक तयार केले होते, पण काढणीच्या वेळेसच पावसाने घात केला. आता जगायचे कसे, हाच प्रश्न समोर आहे," अशी हतबलता एका स्थानिक शेतकऱ्याने व्यक्त केली.

Tadkals crop damage news
Parbhani News | छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरण : बोरीतील वातावरण तापले

तातडीने पंचनामे करण्याची मागणी

निसर्गाच्या या प्रकोपाने ताडकळस परिसरातील शेतकरी पूर्णपणे खचला आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच कृषी विभागाने पुढील काळात पिकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करावे, अशीही विनंती शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news