

ताडकळस : ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव ते दस्तापुर लोहगाव शिवारातील कॅनाल जवळ एका भरधाव ट्रकने छोटाहत्ती टेम्पोला जोराची धडक दिल्याने वाहन चालक गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. जगन्नाथ चाळक असे चालकाचे नाव आहे. ही घटना २६ जानेवारीच्या राञी ७ ते ८ दरम्यान लोहगाव ते दस्तापुर शिवारातील कॅनाल जवळ घडली. सदरील घटनेबाबत ताडकळस पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताचे वडिल विठ्ठलराव केशवराव चाळक यांच्या फिर्याद दिली.
२६ जानेवारीच्या राञी जगन्नाथ चाळक हे एम एच ०१ एल एल ९६०५ या क्रमांकाच्या छोटाहत्ती हे वाहन चालवताना त्यांच्या गाडीला एम एच १६ सी सी ३३०३ या क्रमांकाच्या ट्रक चालकाने भरधाव वेगाने धडक दिली. या अपघातात जगन्नाथ चाळक हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. या बाबत ताडकळस पोलीस ठाण्यांचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे,यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश लोंढे, यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश लोंढे हे करीत आहेत.