

Three-vehicle collision Parbhani
पाथरी : पाथरी माजलगाव या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर आष्टी फाटा परिसरात दि. 9 जुन सोमवारी दुपारी तिहेरी अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात ट्रक, पिकअप व दुचाकी यांचा समावेश असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर पिकअप पलटी झाला.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ वरील आष्टी फाटा परिसरात 9 जून रोजी दुपारी 3 च्या सुमारास ट्रक क्र एन एल 01 ए सी 4255 आणि समोरून येणाऱ्या पिक क्र एम एच 14 एल एल 5708 या दोन वाहनात जोरदार धडक झाली , दरम्यान, घटनास्थळी दुचाकी क्र एम एच 23 बी बी 8143 चा दुचाकीस्वार देखील वाहनांच्या मध्ये सापडल्याने त्या वाहनाचाही अपघात झाला.
दरम्यान, अपघातात तीन जणांना गंभीर दुखापत झाली असून यात दोन दुचाकी स्वार आणि एक पिककप मधील असून त्याला तत्काळ पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. पाथरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आली असून महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत आहे.
या अपघातात जखमी झालेल्या तिन्ही जणांना पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघेही माजलगाव येथील असून त्यांची नावे रोहन अंकुश पवार रा. माजलगाव, गोविंद सुरेशचंद्र जेथलिया रा. माजलगाव, दत्ता प्रकाश नावडकर, रा. माजलगाव अशी नावे आहेत. या तिन्ही जखमींना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे,