

परभणी : कर्तव्यात कसूर केल्याबद्दल देऊळगाव दुधाटे (ता. पूर्णा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिकेवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीमा राजेंद्र पौळ या शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. परंतु, विद्यार्थ्यांना न शिकवणे, सातत्याने रागावणे, स्वतः मोबाईलवर खेळत बसणे, घटक चाचण्या न घेणे तसेच शाळा व्यवस्थापन समितीविषयी अवमानकारक लिखाण करणे अशा प्रकारचे त्यांचे कारस्थाने मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेले होते. याबाबत करण्यात आलेल्या चौकशी अहवालातून या गोष्टी पुढे आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी नदीशा माथूर यांनी त्या शिक्षिकेचे निलंबन केल्याचे आदेश काढले आहेत.