Parbhani Theft Case | एकरुखा येथे घरफोडी; २.१२ लाखांचा ऐवज लंपास

ताडकळस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Burglary
BurglaryPudhari
Published on
Updated on

ताडकळस : ताडकळसपासून जवळ असलेल्या एकरुखा (ता. पूर्णा) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संभाजी हिरामण मोहिते (रा. एकरुखा, ता. पूर्णा) हे पत्नीच्या आजारपणामुळे मुलीच्या इस्लामपूर (ता. पूर्णा) येथील सासरी गेले होते. दरम्यान, ६ जून ते ७ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप व दरवाज्याची कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

Burglary
Parbhani Crime News : परभणीतील बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला

यानंतर चोरट्यांनी घरातील कपाट आणि इतर ठिकाणी ठेवलेले सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली. चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे १ लाख ९२ हजार रुपये असून, २० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

या प्रकरणी संभाजी मोहिते यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news