Parbhani Crime | अवैध तलवार बाळगणाऱ्या व्यक्तीवर कारवाई; एक जण अटकेत

सोनपेठ तालुक्यातील महातपुरी फाटा येथे गस्त घालत असताना कारवाई
Parbhani Crime | अवैध तलवार बाळगणाऱ्या व्यक्तीवर कारवाई; एक जण अटकेत
Pudhari
Published on
Updated on

Sonpeth Police Action

गंगाखेड: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध शस्त्रसाठ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीला अवैध तलवारीसह अटक केली.

सोमवारी (दि. १३) पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंग परिहार, पोलीस हवालदार महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ तसेच पोलीस शिपाई दिलीप निरपत्रीवार आणि शरद सावंत यांचा समावेश होता.

Parbhani Crime | अवैध तलवार बाळगणाऱ्या व्यक्तीवर कारवाई; एक जण अटकेत
Parbhani Crime : परभणी रेल्वे स्थानकावर लिफ्टचे लॉक फोडून सीसीटीव्हीची तोडफोड, कर्मचाऱ्यावर हल्ला

महातपुरी फाटा येथे गस्त घालत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, महातपुरी येथील माऊली मुलगीर हा अवैध तलवार बाळगत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने शेतातील गोठ्यात लपवून ठेवलेली तलवार पोलिसांच्या ताब्यात दिली.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८१/२६ नोंदवून, शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news