Parbhani Historical Stepwells | सेलूच्या ऐतिहासिक बारवांसाठी शासन सकारात्मक - सांस्कृतिक सचिव डॉ. किरण कुलकर्णी

सेलू तालुक्यातील हतनूर येथील प्राचीन मंदिर व बारवेलाही भेट
Selu Barav Heritage
सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची सेलू तालुक्यातील वालूर येथील प्रसिद्ध ऐतिहासिक बारवेला भेटPudhari
Published on: 
Updated on: 

Selu Barav Heritage

सेलू : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सोमवारी (दि.२६) सेलू तालुक्यातील वालूर येथील प्रसिद्ध ऐतिहासिक बारवेला भेट दिली.

यावेळी ते म्हणाले की, "या बारवेचा लौकिक मी आजवर ऐकून होतो, आज प्रत्यक्षात पाहून आनंद वाटला. या बारवेचे जतन व संवर्धन योग्य पद्धतीने होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करू.

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सभापती संजय साडेगावकर, पंचायत समिती सदस्य गणेश राव मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शैलेश तोष्णीवाल, सेलूचे गटविकास अधिकारी उदय जाधव, शासनाच्या बारव समितीचे सदस्य मल्हारीकांत देशमुख, इतिहास संशोधक अनिल स्वामी, अनिल बडगुजर, नागेश जोशी, दत्ता बारहाते आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा' व 'मागोवा पर्यटनाचा' ही दोन पुस्तके डॉ. कुलकर्णी यांना भेट देण्यात आली.

हतनूरच्या प्राचीन मंदिरालाही भेट

त्यानंतर डॉ. कुलकर्णी यांनी सेलू तालुक्यातील हतनूर येथील प्राचीन मंदिर व बारवेलाही भेट दिली. या वास्तूला राज्य संरक्षित स्थळाचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मंदिर संस्थानच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बाळासाहेब आंधळे, दत्तराव आंधळे, आसाराम काकडे, अंकुश शेळके, गोविंद शेळके, रामचंद्र पारवे, महेंद्र गाडे, गटविकास अधिकारी उदय जाधव आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news