परभणी : खुजडा येथील बेकायदेशीर खदानीच्या चौकशीसाठी रिपब्लिकन सेनेचे आमरण उपोषण

Parbhani News | रेल्वे पूल बांधकाम ठेकेदाराला मुरूम पुरविल्याचा आरोप
Republican Sena hunger strike
खुजडा येथील बेकायदेशीर खदानीच्या चौकशीसाठी रिपब्लिकन सेनेने आमरण उपोषण सुरू केले आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: खुजडा येथील खदानीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांनी आजपासून (दि.२५) पूर्णा तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. (Parbhani News)

याबाबत अधिक माहिती अशी की, हटकरवाडी येथील शेतकरी पांडुरंग गंगाराम सदगर यांची खुजडा शिवरात गट क्रमांक १५३ मध्ये जमीन आहे. त्यांनी घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना मुरुम पुरवठा करण्यासाठी १०० ब्रास खडक काढण्यासाठी खदानीची परवानगी तहसिल कार्यालयायाकडून घेतली आहे. परंतू, या खदानीतून १०० ब्रास पेक्षा अधिक प्रमाणात बेकायदेशीर मुरुम उत्खनन करुन घरकुल लाभार्थ्यांना न देता रेल्वे उड्डाणपुलाच्या गुत्तेदारास दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी उपोषणकर्त्यांनी २१ फेब्रुवारीरोजी अर्ज देऊन चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर तलाठी व मंडल अधिकारी यांनी २४ फेब्रुवारी रोजी खदानीची चौकशी करुन अहवाल दाखल करण्यासंबंधी पत्र काढले होते. परंतू अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उलट खदानीतून परत १०० ब्रास मुरुम काढण्यासाठी तहसीलदाराने १० मार्चरोजी परवानगी दिली आहे. दि. १२ ते २४ मार्चपर्यंत मुरुम काढण्याचा कालावधी दिला असता संबंधितांकडून आर्थिक मिलीभगत साधत उत्खनन सुरू ठेवल्याचे समजते. या सर्व गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी सुर्यवंशी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

खुजडा शिवारातील गट क्रमांक १५३ मध्ये परवानगी दिलेल्या खदानीची व उत्खनन करुन काढून नेलेल्या मुरुमाचे ईटीएस मोजमाप घेऊन संबंधितांकडून रॉयल्टी दंड वसूल करण्यात येईल.

- माधवराव बोथीकर, तहसीलदार, पूर्णा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news