

पूर्णा: दमरे नांदेड विभागातील रेल्वेने राबवलेल्या "ऑपरेशन यात्री सुरक्षा"संयुक्त मोहिमेअंतर्गत आरपीएफ बलाने नुकतेच एका सराईत गुन्हेगारास पकडून अटक केली आहे. त्याच्या जवळ आढळून आलेले चोरीचे चार मोबाईल फोन हस्तगत करुन जप्त केलेत. यात,ता.२४ व २५ जून रोजी मध्यरात्री तीन रेल्वे प्रवाशांनी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र.१,२,३ वर छत्रपती संभाजीनगर रेल्वे लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली होती .
त्यानंतर नांदेड येथील रेल्वे सुरक्षा बल टिमने मिळवलेल्या माहीतीनुसार आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस संभाजीनगर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने नगरसोल रेल्वे स्थानकावर संशयीत चोरट्याला पकडून अटक केली. या चोरट्याचे नाव शेख शकील (वय ३२) रा.संभाजीनगर याने मोबाईल फोन चोरी कबूल केले त्याच्याकडून ३०५००/रुपयांचे चार मोबाईल जप्त करण्यात आले.
दरम्यान,दमरे नांदेड विभागात येणाऱ्या रेल्वे गाड्यात रेल्वे व स्थानकावरुन प्रवाशांकडून चोरलेल्या व हिसकावून घेत लंपास केलेल्या असंख्य मोबाईल फोनचा अद्याप शोध लागलेला नाही. रेल्वे प्रवाशांनी आरपीएफ व लोहमार्ग पोलीस स्थानकात त्यांचे मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी दाखल करुन अनेक दिवस महिने वर्ष उलटून गेलेत तरीही मोबाईल मिळाले नाहीत. ट्रेसला लावून देखील चोरटे मिळून येत नाहीत. शिवाय, मोबाईल ट्रेसला लावले जातात की नाही?हेच कळत नाही.तक्रारदार चौकशी करुन थकून गेले तरी मोबाईल ट्रेस कसा होत नाही?असा प्रश्न सबंधीत तक्रारदार प्रवासी करीत आहेत.