Purna Railway Accident | डोळ्याच्या तपासणीसाठी जाताना धावत्या रेल्वेखाली सापडून युवकाचा मृत्यू

पूर्णा रेल्वे स्थानकातील घटना; गौर येथील युवक ठार
Purna Youth Dies Railway Track
Purna Youth Dies Railway TrackPudhari
Published on
Updated on

Purna Youth Dies Railway Track

पूर्णा : पूर्णा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी (दि. ५) सकाळी धावत्या रेल्वेखाली सापडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत युवकाचे नाव आनंद रावसाहेब पारवे (वय ३६, रा. गौर, ता. पूर्णा, जि. परभणी) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद पारवे हे डोळ्याच्या तपासणीसाठी जालना येथील रुग्णालयात जाण्यासाठी शुक्रवारी पहाटे घरातून निघाले होते. ते पूर्णा रेल्वे स्थानकावर हायकोर्ट एक्स्प्रेसने जालना येथे जाण्यासाठी आले होते. संबंधित रेल्वे ज्या प्लॅटफॉर्मवर येणार होती. त्या दिशेने जात असताना ते अचानक धावत्या रेल्वेखाली सापडले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Purna Youth Dies Railway Track
Purna Fake Devgad Hapus | पूर्णेत केमिकलयुक्त ‘देवगड हापूस’ची विक्री; ग्राहकांची फसवणूक, आरोग्य धोक्यात

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृताची ओळख पटवून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर आनंद पारवे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी गौर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद पारवे यांच्या आकस्मिक निधनामुळे गावात शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news