Parbhani News | पूर्णेत विद्यूत खांबावर शॉक लागून कामगाराचा मृत्यू

महिन्याभरातील दुसरी घटना
Parbhani News
Parbhani News | पूर्णेत विद्यूत खांबावर शॉक लागून कामगाराचा मृत्यू file photo
Published on
Updated on

पूर्णा : शहरातील गवळी गल्ली भागात बुधवारी (दि. १९) सायंकाळी ४ च्या सुमारास विद्यूत खांबावर चढून विजेच्या तारेचे काम करताना एक विद्युत कामगार अचानक शॉक लागून खांबावरुन जमीनीवर पडला. डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाल्याने त्याला दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. संतोष पंडितराव जाधव (वय ४४) असे त्यांचे नाव आहे.

पूर्णा शहरातील कमाल टॉकीजच्या मागील भागातील गवळी गल्लीत बुधवारी ४ वा. च्या सुमारास ट्रांसफॉर्मतील फ्यूज काढून विद्यूत खांबावर चढून कंठेश्वर येथील विद्यूत कामगार संतोष जाधव हे तारेचे काम करत होते. यावेळी तारेत बॅक करंट येवून त्यांना जोराचा शॉक बसल्याने ते पोलवरुन खाली जमिनीवर पडले. यात जाधव यांच्या डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत तेथील नागरिकांनी उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात दाखल केले, परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

एका महिन्यातच विद्यूत खांबावर शॉक लागून मृत्यू झालेली ही दुसरी दुर्घटना असून मागील १९ जानेवारी रोजी झिरोफाटा टी पॉईंट कॉर्नर रस्त्याशेजारील खांबावर काम करताना गौर येथील आऊटसोर्सिंग विद्यूत कामगार विशाल जोगदंड याचा मृत्यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news