Purna Railway Flyover | पूर्णेतील रेल्वे उड्डाणपूल होऊनही वाहतुकीसाठी खुला नाही; ऊस वाहतुकीमुळे पुन्हा कोंडी

Parbhani News | पूर्णा-नांदेड-पूर्णा-अकोला रेल्वे लोहामार्गावरील दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे
Purna railway flyover opening delay
रेल्वे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही(Pudhari Photo)
Published on
Updated on

Purna railway flyover opening delay

आनंद ढोणे

पूर्णा: पूर्णा-नांदेड-पूर्णा-अकोला रेल्वे लोहामार्गावरील दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तरीही तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. परिणामी, शेजारील खड्डेमय रस्त्यावरून वाहतूक सुरू असून यंदाही ऊस वाहतुकीमुळे मोठी कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

शेतकरी आणि ट्रक-ट्रॅक्टर वाहनधारकांना चढ रस्त्यावरून गाळपासाठी ऊस नेणे कठीण झाले आहे. रस्त्यावरील चढामुळे वाहनांचे इंजिन पुढील चाके उचलत आहेत, आणि वाहने पलटी होण्याची धोका निर्माण झाला आहे. ही समस्या मागील तीन वर्षांपासून सुरु आहे.

Purna railway flyover opening delay
Parbhani Rain : पूर्णा परिसराला अवकाळी पावसाने झोडपले, खरीप गेले आता रब्बी हंगामही आला धोक्यात

रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम केलेल्या गॅलकोन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या दिरंगाईमुळे उड्डाणपूल अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. यासोबतच पुलाजवळील पर्यायी रस्त्याचे दुरुस्ती व रुंदीकरणही होत नाही. त्यामुळे हयातनगर, सुहागान शेती क्षेत्रातून ऊस वाहतूक ठप्प झाली आहे.

याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदन दिले आहे, पण उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांच्या दुर्लक्षामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम अद्यापही सुरु झालेले नाही.सध्या रेल्वे उड्डाणपूल बांधकाम पूर्ण झाले असले तरी शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी पोहोचवणे अवघड झाले आहे. नागरिक आणि शेतकरी दोघांनाही या समस्येवर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news