Parbhani Crime | पूर्णा शहरात खळबळ : मॉर्निंग वॉक करताना सावकाराचा चाकूने वार करून निर्घृण खून

दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांचा चाकूने पोट व हातावर सपासप वार
Purna Moneylender Stabbed To Death
देवराव साखरे Pudhari
Published on
Updated on

Purna Moneylender Stabbed To Death

पूर्णा : पूर्णा शहरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ४८ वर्षीय सावकाराचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार चाकूने वार करून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २२) सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास हिरो दुचाकी शोरूम-राजमुद्रा चौक मार्गावर घडली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

देवराव बैजाजी साखरे (वय ४८, रा. धनगर गल्ली, पूर्णा, जि. परभणी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते खासगी सावकारी व्यवसाय करत असल्याची माहिती समोर येत आहे.

Purna Moneylender Stabbed To Death
Parbhani News : पूर्णेत अवैध कत्तलखान्यावर धाड; लाखोंचा मुद्देमाल जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, देवराव साखरे हे दररोजप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून थेट चाकूने पोट व हातावर सपासप वार केले. या हल्ल्यात साखरे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्लेखोर घटनास्थळावरून तात्काळ पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतील साखरे यांना तातडीने शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

Purna Moneylender Stabbed To Death
Parbhani road news | कोट्यवधींचा निधी, पण काम निकृष्ट; चारठाणा महामार्गावरील रस्ता रुंदीकरण वादाच्या भोवर‍्यात

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्टता नसून विविध शक्यतांवरून पोलिस तपास करत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, भर रस्त्यात सकाळच्या वेळी घडलेल्या या खुनामुळे पूर्णा शहर हादरले आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या विशेष पथकाने शहरातील अवैध कत्तलखान्यावर कारवाई केली होती. त्यानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच ही हत्या घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news