PDCC Bank Election | पूर्णा गटातून पीडीसीसी बँकेच्या संचालकपदी नंदकुमार डाखोरे विजयी

विजयानंतर पूर्णा शहरासह तालुक्यात जल्लोष; कार्यकर्त्यांकडून स्वागत
Nandkumar Dakhore Win
Nandkumar Dakhore WinPudhari
Published on
Updated on

PDCC Bank Director Election Result

पूर्णा : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पूर्णा गटातील प्राथमिक कृषी पतपुरवठा (विकास) सहकारी संस्था मतदारसंघातून नंदकुमार लक्ष्मणराव डाखोरे यांनी दणदणीत विजय मिळवला. निकाल जाहीर होताच पूर्णा शहरासह तालुक्यात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पहार अर्पण आणि जल्लोष करत त्यांचे स्वागत केले.

या निवडणुकीसाठी १९ जुलै रोजी मतदान पार पडले होते. विकास सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष तसेच त्यांच्या नावावर ठराव असलेल्या प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार होता. पूर्णा गटातील एकूण ६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Nandkumar Dakhore Win
Parbhani Crime : परभणीत गावठी पिस्तुलासह तिघांना पकडले

२० जुलै रोजी परभणी येथे मतमोजणी झाली. यामध्ये अधिकृत उमेदवार नंदकुमार डाखोरे यांना ३४ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी तुळशीराम बोबडे यांना २८ मते मिळाली. तीन मतपत्रिका अवैध ठरल्याने डाखोरे यांनी सहा मतांच्या फरकाने विजय मिळवला.

ही निवडणूक जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जात होती. या निवडणुकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार राजेश विटेकर आणि आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखालील गटांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

नंदकुमार डाखोरे यांच्या विजयासाठी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि पूर्णा नगरपालिकेचे नगराध्यक्ष बंटी (नितीन) कदम यांनी विशेष परिश्रम घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Nandkumar Dakhore Win
Parbhani Crime | सोनपेठ तालुक्यात अवैध दारूसाठ्यावर धडक कारवाई; ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त

निकालानंतर पूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि महात्मा बसवेश्वर चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करून विजयी उमेदवाराचे स्वागत करण्यात आले. यावेळी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्वागत समारंभाला नवनिर्वाचित संचालक नंदकुमार डाखोरे, नगराध्यक्ष नितीन कदम, माजी सभापती व्यंकटराव देसाई, नगरसेवक राजेश भालेराव, विश्वनाथ होळकर, सुधाकर खराटे, पंचायत समिती सदस्य नरेश जोगदंड, विलास गिरी, हरिभाऊ कदम, चांदोजी बोबडे, भगवान इंगोले, साहेबराव भाकरे, शेख इलियास, शेख इरफान, लखन शिंदे, किशोर, जगदीश ढोणे, राजू गिरी, सुदर्शन ढोणे यांच्यासह डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news