Purna Accident | गौर गावात हायवा टिप्परला विद्युत तारा अडकल्या; ८ खांब व रोहित्र जमिनदोस्त, वीजपुरवठा खंडित

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही
Hyva tipper pulls down electric poles in Purna
Hyva tipper pulls down electric poles in PurnaPudhari
Published on
Updated on

Hyva tipper pulls down electric poles in Purna

पूर्णा : तालुक्यातील गौर येथे गुरूवारी (दि. २) पहाटे साडेपाचच्या सुमारास हायवा टिप्परमुळे मोठी दुर्घटना घडली. टिप्परच्या हायड्रॉलिक भागाला विद्युत तारा अडकून तब्बल ८ वीजखांब व एक रोहित्र जमिनदोस्त झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळू वाहतूक करून परत येत असलेला हायवा टिप्पर गावातील जुन्या बसस्थानकाजवळून जात होता. वाळू खाली केल्यानंतरही चालकाने टिप्परचा मागील हायड्रॉलिक भाग खाली न करता तोच उंचावलेल्या अवस्थेत पुढे निघाला. याच दरम्यान टिप्परचा उंचावलेला भाग विद्युत तारा व केबलला अडकला.

Hyva tipper pulls down electric poles in Purna
Parbhani News : अधिकाऱ्यांना फुकट पाणी, प्रवाशांची मात्र लूट

तारा अडकल्यानंतरही टिप्पर काही अंतर पुढे सरकल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेत आठ वीजखांब तुटून पडले, तर एक रोहित्रही कोसळून पूर्णपणे नुकसानग्रस्त झाले. सकाळी ही घटना उघडकीस येताच ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली.

घटनेनंतर संबंधित टिप्पर मालकाकडून नुकसानग्रस्त खांब व साहित्य दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले असून महावितरणचे अधिकारी या कामावर देखरेख करत आहेत. या दुर्घटनेमुळे गावातील वीजपुरवठा अनेक तास खंडित राहिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news