Parbhani accident | परभणी-पुणे ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक; मानवतचे ४ तरुण जागीच ठार

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती
Parbhani accident | परभणी-पुणे ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक; मानवतचे ४ तरुण जागीच ठार
Published on
Updated on

Parbhani Pune travels collision 4 Manwath youths killed in accident

मानवत : परभणीकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सने समोरील दुचाकीला दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील चार जण जागीच ठार झाले. हा थरारक अपघात २९ मे रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास मानवत ते परभणी या राष्ट्रीय महामार्गवरील राहुल जिनिंग समोर घडला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, मृतांपैकी एकाची ओळख पटवणे सुरुवातीला अत्यंत कठीण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, 'एन एल ०१ बी १३७४' क्रमांकाची श्रीनिधी ट्रॅव्हल्स ही परभणीहून पुण्याकडे जात होती. दरम्यान, राहुल जिनिंग समोर समोरून येणाऱ्या 'एम एच २२ बी बी ४७२४' क्रमांकाच्या दुचाकीला ट्रॅव्हल्सने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील चारही जण ठार झाले. शुभम आप्पाराव दहे (वय ३० वर्षे), विष्णू गोरे (वय २८ वर्षे), प्रल्हाद अशोकराव कुटे (वय २९ वर्षे), नवनाथ शामराव जाधव (वय ३८ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

Parbhani accident | परभणी-पुणे ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक; मानवतचे ४ तरुण जागीच ठार
Dhule Murder | साक्री तालुक्यात तरुण आणि तरुणीची वेगवेगळ्या ठिकाणी खून, भोंदू गिरीतून हत्याकांड?

अपघाताचे वृत्त समजताच राहुल जिनिंगचे सुरेश कडतन यांनी अपघाताची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांना तात्काळ दिली परंतु ते घटनास्थळी उशिरा आल्याचे कडतन यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक (पोउनि) किशन पतंगे, प्रमोद देवकते आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमी व मृतांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.

Parbhani accident | परभणी-पुणे ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक; मानवतचे ४ तरुण जागीच ठार
Drowning Death Solapur | राजस्थानी कारागिरांचा उजनी डाव्या कालव्यात बुडून मृत्यू

अपघातानंतर पोलिसांनी सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयाच्या आवारात मृतांच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एकाच गावातील चार जणांचा अशा अपघातात मृत्यू झाल्याने मानवत शहरासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडत असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले जाणार आहेत. या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून महिनाभरात झालेल्या अपघातात एकूण 9 जणांचा बळी गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news