

पूर्णा: पूर्णा तालुक्यातील पूर्णा ते सुहागन- हयातनगर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाप्रमाणे काम व्हावे, या मागणीसाठी सुहागन येथील सामाजिक कार्यकर्ते खुशाल भोसले यांनी सा. बां उपविभाग पूर्णा कार्यालासमोर ९ जूनपासून सुरू केलेले आमरण उपोषण मागे घेतले. उपविभागीय अभियंता संजयकुमार देशपांडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले.
यावेळी, सा बां.चे अभियंता डी. एस. शिंदे, ज्ञानेश्वर भोसले, अनिल बुचाले, माऊली बोकारे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पूर्णा तालुक्यातील हयातनगर - सुहागन- पूर्णा (४२८) राज्य मार्गाची सुधारणा व मजबुतीकरण, डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून एका कंत्राटदारास देण्यात आले आहे. या कामात दोन्ही बाजूंच्या रस्ता साईड पट्टा भरणे व डांबरीकरणाचे काम अंदाजपत्रकानुसार न करता निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. हे काम इस्टिमेट प्रमाणे करण्यात यावे. व झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी, यामागणीसाठी सुहागन येथील सामाजिक कार्यकर्ते खुशाल भोसले यांनी सा. बां. उपविभाग पूर्णा कार्यालयासमोर सोमवार (दि. ९) पासून बेमुदत आमरण उपोषण चालू केले होते.