Shiv Sena UBT Protest | पाथरीत खा. बंडू जाधव यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

तहसिलसमोर निषेध मोर्चा, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
 Shiv Sena UBT Agitation on MP Bandu Jadhav
शिवसेना ठाकरे गटाने खासदार बंडू जाधव यांच्या भूमिकेविरोधात प्रतीकात्मक निषेध आंदोलन केले.Pudhari
Published on
Updated on

Shiv Sena UBT Agitation on MP Bandu Jadhav

पाथरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. १९) पाथरी तहसिल कार्यालयासमोर खासदार बंडू जाधव यांच्या भूमिकेविरोधात प्रतीकात्मक निषेध आंदोलन केले.

कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चा काढत तहसिलसमोर खासदार जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन केले. यावेळी “गद्दारी खपवून घेणार नाही” अशा घोषणा देण्यात आल्या.

 Shiv Sena UBT Agitation on MP Bandu Jadhav
Parbhani news | वाळू माफियांनी खोदलेला 'मृत्यूचा सापळा'; गोदावरीत बुडून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “बाळासाहेबांची विचारधारा सोडून सत्तेच्या जवळ जाणाऱ्या निर्णयांचा आम्ही निषेध करत आहोत. जनतेचा विश्वासघात करणाऱ्या लोकप्रतिनिधींना लोकशाही मार्गाने जाब विचारला जाईल.”

या आंदोलनात जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांच्यासह कल्याणराव रेंगे, मुंजाभाऊ कोल्हे, हरिभाऊ वाकणकर, आत्माराम वाघ, रंजित गिराम, रावसाहेब निकम, तुकाराम हरकळ, सत्यनारायण घाटुळ, माऊली गलबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news