Raja Ravi Varma Award | ग्रामीण मातीतून जागतिक कॅनव्हासवर; परभणीच्या सुशीलकुमार घुंबरे यांना ‘राजा रवि वर्मा’ पुरस्कार

94 कलाकारांतून 10 जणांची निवड; परभणीच्या चित्रकाराचा नेहरू सेंटरमध्ये गौरव
Parbhani Painter Sushilkumar Ghumbre
परभणी जिल्ह्यातील चित्रकार सुशीलकुमार एन. घुंबरे यांना ‘बेस्ट आर्टिस्ट – राजा रवि वर्मा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले Pudhari
Published on
Updated on

Parbhani Painter Sushilkumar Ghumbre Raja Ravi Varma Award

परभणी : ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चित्रकलेची साधना सुरू ठेवणाऱ्या परभणी जिल्ह्यातील चित्रकार सुशीलकुमार एन. घुंबरे यांच्या कलाप्रवासाला जागतिक व्यासपीठावर मानाची पावती मिळाली आहे. मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत आयोजित जागतिक ग्रुप चित्र प्रदर्शनात त्यांना ‘बेस्ट आर्टिस्ट – राजा रवि वर्मा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. रविवारी (दि. १६) सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे परभणीच्या कला क्षेत्राची देश-विदेशात नवी ओळख निर्माण झाली आहे.

कला कॉनेट संस्थेच्या वतीने ११ ते १६ ऑगस्टदरम्यान नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत जागतिक ग्रुप चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात देश-विदेशातील तब्बल ९४ कलाकारांनी सहभाग घेतला. विविध कलाकारांच्या कलाकृतींचे परीक्षण केल्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १० कलाकारांची बेस्ट अवॉर्डसाठी निवड करण्यात आली. यामध्ये पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील सुशीलकुमार घुंबरे यांनी स्थान मिळवत ‘राजा रवि वर्मा पुरस्कार’ पटकावला.

हा पुरस्कार सहायक संचालक संतोष पेडणेकर, संचालक मिलिंद तावडे, ज्येष्ठ कलाकार व कवी विजयराज बोधनक आणि ज्येष्ठ कलाकार मंगेश चोरगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Parbhani Painter Sushilkumar Ghumbre
Parbhani crime news: ताडकळसजवळ पांदण रस्त्यावर पोलिसांची धाड; पावणेसात लाखांचा अवैध गुटखा व कार जप्त

घुंबरे यांच्या चित्रांमधील विषयाची खोली, आशयपूर्ण मांडणी, प्रभावी रंगसंगती आणि चित्रतंत्रातील प्रगल्भता यामुळे त्यांच्या कलाकृतींनी परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. सातत्यपूर्ण मेहनत, प्रयोगशीलता आणि चित्रकलेवरील निष्ठेच्या बळावर त्यांनी ग्रामीण भागातून थेट जागतिक कला व्यासपीठापर्यंत मजल मारली.

या यशामुळे घुंबरे यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि कला क्षेत्रातील सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘कलम नाही, ब्रश आहे हाती... आणि आज त्याच ब्रशला मिळाला मानाचा मान!’ अशा शब्दांत कुटुंबीयांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुशीलकुमार घुंबरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, ‘तुलिकेतून उतरते जेव्हा स्वप्नांची वारी, कॅनव्हासवर फुलते कलाकाराची कहाणी. मेहनत बोलते तेव्हा सन्मान झुकतो. आज नेहरू सेंटरमध्ये तेच अनुभवायला मिळाले,’ असे सांगितले.

Parbhani Painter Sushilkumar Ghumbre
Parbhani News : डॉक्‍टर-कर्मचार्‍यांचे जिल्‍हा रुग्‍णालयात चार तास कामबंद आंदोलन

घुंबरे यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील कलाकारांमध्येही नवी उमेद निर्माण झाली आहे. कला कॉनेटच्या जागतिक प्रदर्शनामुळे देश-विदेशातील नवोदित आणि प्रस्थापित कलाकारांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली. विविध शैली, विषय आणि माध्यमांमधून साकारलेल्या कलाकृतींमुळे प्रदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

अशा प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर परभणीच्या कलाकाराला ‘बेस्ट आर्टिस्ट’चा बहुमान मिळणे ही जिल्ह्याच्या कला क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. ग्रामीण कलाकारही सातत्य, मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर जागतिक पातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतो, हे घुंबरे यांच्या यशातून अधोरेखित झाले आहे.

दरम्यान, या पुरस्कारानंतर २१ ऑगस्ट रोजी मुंबईतील हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित विशेष कला कार्यक्रमात सुशीलकुमार घुंबरे यांचा पुन्हा एकदा सन्मान करण्यात येणार आहे.

Parbhani Painter Sushilkumar Ghumbre
Bribe Case Parbhani: लाच मागणारा तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात

१० कलाकारांची पुरस्कारासाठी निवड

जागतिक चित्र प्रदर्शनात सहभागी झालेल्या ९४ कलाकारांमधून १० कलाकारांची बेस्ट अवॉर्डसाठी निवड करण्यात आली. त्यात सुशीलकुमार घुंबरे यांना राजा रवि वर्मा पुरस्कार, संतोष केसरी यांना अबनिंद्रनाथ टागोर पुरस्कार, डॉ. आशिषकुमार गुप्ता यांना अमृता शेर-गिल पुरस्कार, देवांशी शेठ यांना एम. एफ. हुसेन पुरस्कार, गायत्री कनुपार्थी यांना एस. एच. राजा पुरस्कार, नफिसा टोपीवाला यांना एफ. एन. सूझा पुरस्कार, अनाघा वर्मा यांना व्ही. एस. गायतोंडे पुरस्कार, सृजन प्रभाकर यांना रघु राय पुरस्कार, सुधा बार्शीकर यांना तय्यब मेहता पुरस्कार आणि मोनाली सिंग यांना रघुबीर सिंग पुरस्कार देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news