

पूर्णा : तालुक्यातील माटेगाव ते आहेरवाडी ह्या रस्त्यावर असलेल्या कामाई नदी ओढ्यावर सध्या पूल बांधकाम चालू आहे. सदरील पुलाचे बांधकाम हे शेतशिवार गट क्रमांक २१ मध्य शेतकरी गणपती नवनाथ बोबडे यांच्या शेत जमिनीजवळ होत आहे.
या पुलाचे बांधकाम हे पूर्वी ज्या दिशेने नदीचे पाणी वाहत होते त्या पध्दतीने वाहून जाण्यासाठी बांधकाम आवश्यक असताना ते विरुद्ध दिशेने होत असून ते बांधकाम सरळ कॉलममध्ये करावे, यासाठी शेतकरी गणपती बोबडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसीलदार यांच्याकडे केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की,सदर पुलाचे बांधकाम पूर्विच्या पाण्याच्या प्रवाह विरोधात होत असून पावसाळ्यात पूर आल्यास ते पाणी शेतकऱ्याच्या शेतात शिरुन पिकासह जमीन खरडून जाणार आहे.असा संभाव्य धोका असताना देखील सबंधीत खात्याचे अधिकारी व बांधकाम गुत्तेदार हे कोणतीही उपाययोजना करताना दिसून येत नाही. त्यामुळे सबंधीत शेतकरी हवालदिल झाला आहे. याकडे सा बां उपविभाग पूर्णाचे अभियंता यांनी त्वरित लक्ष देवून चालू असलेले काम थांबवून सरळ कॉलम मध्य ते करावे. अन्यथा न्याय मिळण्यासाठी कायदेशीर आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल.
रा मा २४९ ते आहेरवाडी प्र जि मा १० रस्त्यावरील साखळी क्र २/८०० मधील प्रगतीपथावर असलेले पुलाचे बांधकाम हे अस्तित्वातील वक्राकार नदीच्या प्रवाहानुसार सर्वेक्षण करुन मुळ नळकांडी पुलाच्या ठिकाणी करण्यात येत आहे. नवीन आराखड्यानुसार सदरील पूलाची उंची वाढवून प्रवासासाठी पाच गाळ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच आजुबाजुच्या शेतकऱ्यांच्या शेतात नैसर्गिक आपत्ती वगळता पाणी जाणार नाही,याची दक्षता घेण्यात येत आहे.
संजय देशपांडे, उप अभियंता, सा बां उपविभाग पूर्णा.