Parbhani News : शासनाची फसवणूक; कनिष्ठ लिपिकासह २ अधिकाऱ्यांवर गुन्हे

जिल्हा सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालयातील प्रकार
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

Parbhani News : Govt's Cheating; Offenses against 2 officers including Junior Clerk

परभणी, पुढारी वृत्तसेवा जिल्हा सहाय्यक संचालक आरोग्य सेवा, कुष्ठरोग कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाने लेखा व कोषागार कार्यालयातून चार वेळा अतिरिक्त एरियर्सची रक्कम स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर वळती करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या माध्यमातून शासनाची १२ लाख ८० हजार १३६ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणी कनिष्ठ लिपिकासह तत्कालीन दोन आहरण व संवितरण अधिकाऱ्यांविरुद्ध नवा मोंढा पोलिस ठाण्यात १३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Parbhani News : जिल्हा शल्यचिकित्सक अन् जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन

याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय कुमार पांचाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, परभणी येथील जिल्हा सहाय्यक संचालक आरोग्य सेवा, कुष्ठरोग कार्यालयात कार्यरत असलेले कनिष्ठ लिपिक वीरेंद्र मोरेश्वर सुतवणे यांनी २९ मे २०२० ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत लेखा व कोषागार कार्यालयातून शासनाची अतिरिक्त एरियर्सची रक्कम चार वेळा स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणाची उपसंचालक आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशानुसार त्रिस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात आली.

चौकशीत वीरेंद्र सुतवणे यांनी एकूण १२ लाख ८० हजार १३६ रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यावर वळती केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात तत्कालीन आहरण व संवितरण अधिकारी डॉ. विद्या भोजराज सरपे आणि डॉ. पंढरीनाथ हरिभाऊ लखमवार यांच्या कार्यकाळात ही रक्कम काढण्यात आली. वेतन देयक व एरियर्सची रक्कम अदा करण्यापूर्वी ती योग्य आहे की नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची होती. मात्र, या प्रकरणात आवश्यक तपासणी व दक्षन न घेतल्याने त्यांच्याकडून हलगर्जीपण व निष्काळजीपणा झाल्याचे चौकशी नमूद करण्यात आले आहे.

Crime News
Parbhani News : मानवत तालुक्यातील अपहरण झालेल्या युवकाची सुटका

कनिष्ठ लिपिक वीरेंद्र सुतवा तसेच डॉ. विद्या सरपे आणि पंढरीनाथ लखमवार यांनी संगनमता शासनाची आर्थिक फसवणूक करू स्वतःचा आर्थिक लाभ करू घेतल्याचा आरोप आहे. या चौकश अहवालाच्या आधारे तिघांविरुद्ध नव मोंढा पोलिस ठाण्यात फसवणुकीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सपोनि. शिंदे करी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news