परभणी : जिंतूरमध्ये आढळला रुमालाने आवळलेला मृतदेह

परभणी : जिंतूरमध्ये आढळला रुमालाने आवळलेला मृतदेह

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर शहरात एसटी आगार परिसरात रुमाल आवळलेला मृतदेह आढळून आला. छिन्नविच्छिन्न अवस्थेत अढळलेल्या मृतदेहावरुन हा खून असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

शहरातील मोकळे मैदान नशेखोर माफियांचे अड्डे बनलेले असून अशा दुर्लक्षित मोकळ्या जागेवर मोकाट तरुणाई बिनदिक्कत विविध प्रकारे रात्री अपरात्री नशा करतांना दिसून येत आहे. आज (दि. 21) सकाळी शहरातील एसटी आगाराच्या समोरील उलट्या नदी शेजारील झाडाझुडपाच्या खड्ड्यात एका अनोळखी 34 वर्षीय इसमाचा छिन्नविच्छिन्न चेहरा व गळ्याभोवती रुमाल आवळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. सदर मयत हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील वागझरीचा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आगाराच्या परिसरात मृतदेह सापडण्याची ही दुसरी घटना आहे. स्थानिक पोलीस प्रशासनास घटनेची माहिती मिळताच पोनी अनिरुद्ध काकडे व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफने, प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी प्राची कर्णे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेच्या तपासासाठी श्वान पथकास सुद्धा पाचारण करण्यात आले होते.

शहरातील जिल्हा परिषद मैदान, एसटी आगारा पाठीमागील जुने स्टँड, परभणी मार्गावरील साई मैदान आदी तसेच खैरी प्लॉट लगत असलेले जनावरांचा दवाखाना समोरील मोकळे मैदान आदी ठिकाणी तरुणाई माफियांचे नशेखोरीचे अड्डे बनत चालले आहेत.उपरोक्त सर्व मोकळ्या मैदानावर टीवळखोर नशेबाज टोळके विविध प्रकारे नशा करत असतात.या बाबी कडे स्थानिक पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news