Parbhani Murder |परभणीत ऑटो चालकाचा धारधार शस्त्राने खून

आरोपी शोधण्यासाठी नानलपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार
Parbhani Murder |परभणीत ऑटो चालकाचा धारधार शस्त्राने खून
Parbhani Murder |परभणीत ऑटो चालकाचा धारधार शस्त्राने खून
Published on
Updated on

परभणी : शहरातील नांदखेडा रोडवरील सोमनाथ नगर कमानीमागे शनिवारी (दि.14) दुपारच्या सुमारास ऑटो चालकाची अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने गळ्यावर, पाठीवर आणि मनगटावर वार करून हत्या केल्याची घटना घडली.

सय्यद अकबर सय्यद गफूर (वय 42, रा. पाकिजा मोहल्ला, जिंतूर रोड) असे खुन करण्यात आलेल्या ऑटो चालकाचे नाव आहे. ही घटना प्रत्यक्ष पाहणार्‍यांनी सांगितले की, मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. नागरिकांनी तात्काळ नानलपेठ पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक जीवन बेनीवाल, पोनि.गणेश कदम, सपोनि.खजे, पोउपनि.बिक्‍कड, पोह.इर्शाद, लिंगायत व सानप यांच्यासह स्थागुशाचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनेची तातडीचा पंचनामा नोंद करून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.

घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपी शोधण्यासाठी नानलपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ यांनी देखील भेट दिली. सय्यद अकबर सय्यद गफूर हे शांत स्वभावाचे, निर्व्यसनी व्यक्ती म्हणून परिचित होते. ते परभणी तहसील कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत सय्यद अफजल सय्यद यांचे लहान बंधू होत. पोलिसांनी घटनास्थळी शहानिशा करून साक्ष्य संकलन सुरू केले असून, आरोपी शोधण्याचे काम वेगाने सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news