परभणी : मायलेकांना चाकूचा धाक दाखवून ५१ हजारांची रोकड लांबवली

Parbhani Crime News | चुडावा-सातेफळ रस्त्यावरील घटना
 Parbhani Crime News
प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
Published on
Updated on

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: दुचाकीवरील मायलेकांना चाकूचा धाक दाखवून तसेच डोक्यात वार करून ५१ हजार रुपये हिसकावून अज्ञात तिघांनी दुचाकीवरून पोबारा केला. ही धक्कादायक घटना चुडावा -सातेफळ रस्त्यावर सोमवारी (दि.६) सायंकाळी पावणेसात वाजता घडली. रफिक बडेमिया पठाण (वय ५२, रा. सातेफळ वाघ, ता. पूर्णा) असे अज्ञातांच्या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. (Parbhani Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, रफिक पठाण व त्यांची आई बासूमबी बडेमिया पठाण हे दोघे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता मोटारसायकलवरून (एम एच २२ ए जी ४१७३) नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे घरकूल बांधकामासाठी नातेवाईकांकडून उसने पैसे आणण्यासाठी गेले होते. ५० हजार रुपये घेऊन ते दुपारी ४ वाजता घरी परत येत होते. त्यावेळी चुडावा - सातेफळ रस्त्यावर खासदार फार्म हाऊसजवळ त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पठाण यांची गाडी आडवली. आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पठाण यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांच्या गळ्याला चाकू लावला. त्यानंतर पठाण यांच्या डोक्यावर चाकूने वार केला. पॅन्टच्या खिशातील ५० हजार रुपये काढून घेतले. तसेच त्यांच्या आईला मारहाण करून दीड हजार रुपये, मोबाईल हिसकावून घेऊन पोबारा केला. (Parbhani Crime News)

या घटनेनंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, डॉ. समाधान पाटील, चुडावा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तिघांच्या शोधात पोलिस पथके रवाना केली आहेत.

 Parbhani Crime News
परभणी: अज्ञात वाहनाच्या धडकेत केकरजवळा येथील तरुणाचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news