परभणी: माटेगावात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; तरुणाला अटक

परभणी: माटेगावात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; तरुणाला अटक
Published on
Updated on

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील माटेगाव येथील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा गावातीलच एका २९ वर्षीय तरुणाने पैशाचे आमिष दाखवून तिच्या घरासमोरील अंगणात विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी तरुणाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्याच्या माटेगाव येथील अनुसुचित जाती जमाती समाजाची एक १७ वर्षीय विद्यार्थिनी शुक्रवारी दुपारी १.३० च्यादरम्यान तिच्या घरासमोरील अंगणात एकटी उभी होती. यावेळी एका २९ वर्षीय तरुणाने तिचा उजवा हात पकडून तिला ५०० रुपयांची नोट देण्याचा आग्रह करू लागला. आणि काही सांगू नकोस, माझ्यासोबत संबंध ठेव, असे म्हणून तिचा विनयभंग केला.

या प्रकरणी पीडितेने फिर्याद दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सपोनि रेखा शहारे यांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news